शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदरकर महावितरणला ठोकणार टाळे

By admin | Updated: July 17, 2015 23:08 IST

घोडबंदर भागातील अनेक ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याने येथील रहिवासी हैराण झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल

ठाणे : घोडबंदर भागातील अनेक ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याने येथील रहिवासी हैराण झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल आता स्थानिक नगरसेवक आणि व्यापाऱ्यांनीही घेतली आहे. त्यानुसार, येथील स्थानिक नगरसेवक, विभागप्रमुख आणि काही व्यापाऱ्यांनी महावितरणला पत्रव्यवहार केला असून वीजपुरवठा एका आठवड्याच्या आत सुरळीत झाला नाही तर ढोकाळी येथील कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशारा त्यांनी महावितरणला दिला आहे.काही महिन्यांपासून घोडबंदर येथील मानपाडा, शिवाजीनगर, मनोरमानगरचा काही भाग, गणेशनगर, आझादनगर, ब्रह्मांडचा काही भाग, कोलशेतचा काही भाग येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित होण्यामागचे कारण काय, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला असता त्यांना कोणतेही उत्तर महावितरणकडून मिळत नाही. विशेष म्हणजे महावितरणने सुरू केलेल्या कॉलसेंटरवर तक्रार केल्यानंतर पुढे कोणत्याही स्वरूपाची कारवाई होत नसल्याचा अनुभव येथील नागरिकांना वारंवार आला आहे. याकडे महावितरणसोबत स्थानिक लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. तसेच यासंदर्भातील वृत्तही लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर, आता वृत्ताची दखल घेऊन स्थानिक नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि येथील व्यापाऱ्यांनी मानपाडा गाव, मार्केट येथील रहिवाशांच्या सह्यांचे निवेदन महावितरणच्या वागळे येथील मुख्य कार्यालयासह पातलीपाडा आणि ढोकाळी येथील कार्यालयालादेखील दिले आहे. परंतु, महावितरणने या पत्राला उत्तर दिले नाही. आता त्यांना शेवटचा अल्टीमेटम देण्यात आला असून आठवड्याभरात वीजपुरवठा सुरळित न झाल्यास वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर ढोकाळी येथील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.