गणेश नाईक समर्थकांनी पक्षांतर केल्यास नगरसेवकपद जाईल- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 06:40 IST2019-08-03T23:14:46+5:302019-08-04T06:40:36+5:30
दहा नगरसेवकांनी घेतली पवारांची भेट

गणेश नाईक समर्थकांनी पक्षांतर केल्यास नगरसेवकपद जाईल- शरद पवार
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहू इच्छिणाऱ्या दहा नगरसेवकांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागा असे पवार यांनी सांगितले असून नाईक समर्थकांनी पक्षांतर केल्यास त्यांचे पद धोक्यात येईल असेही स्पष्ट केले.
नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसमधील सर्व ५२ नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याचे नाईक समर्थकांनी स्पष्ट केले होते. परंतु प्रत्यक्षात पक्षातील एक गटाने राष्ट्रवादीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर शुक्रवारी चर्चा केल्यानंतर दहा नगरसेवकांनी मुंबईमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी नवी मुंबईमधील परिस्थितीचा आढावा घेवून पुन्हा पक्षबांधणी जोमाने करा अशा सुचना सर्वांना दिल्या. नवीन जिल्हा अध्यक्ष म्हणून माजी उपमहापौर अशोक गावडे यांच्यावर धुरा सोपविण्याचे जवळपास निश्चीत केले असून ऐरोली मतदार संघातील पक्षबांधणीची जबाबदार नगरसेवक शंकर मोरे यांच्यावर सोपविली आहे. पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे एकजरी नगरसेवक पक्षात राहिला तर पक्ष बदलणाऱ्यांचे पद धोक्यात येवू शकते असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. या बैठकीला ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी व त्यांचे समर्थक तीन नगरसेवक, अशोक गावडे, शंकर मोरे, शुभांगी पाटील, शशिकला पाटील, सायली शिंदे, संगीता बोºहाडे व इतर पदाधिकारी उपसिथत होते. यावेळी सीबीडीमधील तीन नगरसेवक अनुपस्थित असल्याने ते पक्षात राहणार का याविषयी शंका उपस्थित होत आहे.