शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

गणेश नाईक-जितेंद्र आव्हाड यांच्यात पुन्हा जुंपली; शरद पवारांवरील वक्तव्याचे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 2:17 AM

नवी मुंबई पालिका निवडणूक रंगणार

नवी मुंबई /ठाणे : नवी मुंबई महापालिकेची येऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूकगणेश नाईक- जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे चांगलीच रंगणार आहे. बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा बाप एकच आहे, अशा शब्दांत आव्हाड यांनी गणेश नाईकांवर टीका केली होती. आव्हाडांच्या या टीकेला उत्तर देताना बुधवारी नाईक यांनी शरद पवार यांनीही पक्ष बदलले आहेत. मग त्यांचाही बाप काढणार का, असा सवाल केला आहे.

तर पक्षांतर करणाºया शरद पवारांची गणनाही बाप बदलणाºया औलादींमध्ये करणार का? या गणेश नाईक यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी नाईक हे कृतघ्न असल्याचा आरोप बुधवारी केला आहे. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी सोडून अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या भूमिकेवर दर दहा वर्षांनी मला बाप बदलण्याची सवय नाही, असा टोला मंगळवारी आव्हाड यांनी लगावला होता. त्याला नाईक यांनी तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले आहे. एकाएकी कोण पक्ष बदलत नाही. जनतेसाठी, विकासकामांसाठी, स्वाभिमानासाठी आपण पक्ष बदलले आहेत. आपल्या आधी शरद पवार साहेबांनीही अनेक वेळा पक्षबदल केला आहे. मग पवार यांची गणनादेखील बाप बदलणाºया औलादीत करणार का, असा प्रतिप्रश्न नाईक यांनी उपस्थित केला आहे.

डॉ. आव्हाड यांनी म्हटले आहे की, शरद पवारांचा इतिहास गणेश नाईक यांना कितपत माहीत आहे, हे मला माहीत नाही. शरद पवार यांनी बाप नाही बदलला, तर ते स्वत:च बाप झालेत. १९७७ आणि १९९९ साली त्यांनी पक्ष काढून तुमच्यासारखे ६० ते ७० आमदार निवडून आणले. त्याला बाप बदलणे, नव्हे बाप होणे म्हणतात. तुम्ही कृतघ्न आहात, हेच मला नवी मुंबईकरांना दाखवायचे होते. ते मी पुराव्यानिशी दाखवून दिले, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

आगरी समाजाची घरे पाडत असताना नाईक कधी धावून गेले नाहीत, मी गेलो होतो, विटाव्याची घरे पाडत असताना जेव्हा जेव्हा आगरी समाजावर संकट आले, तेव्हा तेव्हा तुम्ही कायद्याची चौकट दाखवत निघून गेलात. पुन:सीमांकन झाले पाहिजे, हे दाखवून देण्याची ताकद आमच्यात आहे. ते आम्ही करून दाखवले, तुम्ही ते नाही केलेत. आपला राजकीय हेतू साध्य व्हावा, यासाठी आपल्या मुलाचा बळी दिलात. तेव्हा समाजाची काय बिशाद, असे आव्हाड यांनी म्हटले.

खाली कोण घसरले?तुमच्यावर केलेल्या उपकारांची तुम्हाला कधीही जाणीव नसते. आगरी समाजाने असो, नवी मुंबईकरांनी असो, बाळासाहेबांनी असो की, शरद पवारांनी; तुम्ही त्यांची जाण कधीच ठेवली नाही. महत्त्वाचे म्हणजे बाप काढण्याचे विधान तुमचे आहे, मी बाप काढला नाही. कुठल्या तरी फडतूस पिक्चरचा डायलॉग वापरून तुम्ही बाप काढला होता. त्यामुळे खाली घसरलात तुम्ही की मी, हे आठवले तर बरे, असेही आव्हाड यांनी म्हटले.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकJitendra Awhadजितेंद्र आव्हाडElectionनिवडणूक