शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गोदाम दुर्घटनेतील आठ जणांवर अंत्यसंस्कार

By admin | Updated: January 3, 2015 01:22 IST

तालुक्यातील रहानाळ गावात मढवी कम्पाउंडमध्ये मागील आठवड्यात भंगाराच्या गोदामांना लागलेल्या आगीत आठ कामगार मृत्युमुखी पडले होते.

भिवंडी - तालुक्यातील रहानाळ गावात मढवी कम्पाउंडमध्ये मागील आठवड्यात भंगाराच्या गोदामांना लागलेल्या आगीत आठ कामगार मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या मृतदेहांवर शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता गौरीपाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी भारतातील नेपाळ दूतावासातील सदस्य गणेश अधिकारी, शिवसेना नेपाळी श्रमिक युनियनचे अध्यक्ष मास्टर थापा, नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आकडे, आई एकवीरा देवी संस्थानचे विश्वस्त मदन भोई यांच्यासह शेकडो गोदाम कामगार उपस्थित होते.तालुक्यातील गोदामात नेपाळ राज्यातील अनेक कामगार रोजीरोटीसाठी काम करीत आहेत. यापूर्वी कोपर गावाच्या हद्दीत अनधिकृत गोदामाची इमारत कोसळल्याने रेडिमेड गारमेंट कंपनीत काम करणारे काही कामगार मयत झाले होते. त्यानंतर, २७ डिसेंबर रोजी रहानाळ गावात भंगारच्या गोदामांना आग लागून आठ कामगार जळून मृत झाले. त्यांचे मृतदेह डीएनए चाचणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेले होते. त्या सर्व मृतदेहांवर त्यांच्या वारसांनी शुक्रवारी सायंकाळी गौरीपाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. नेपाळी दूतावासाचे सदस्य गणेश अधिकारी हे या अंत्यसंस्कारांस उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, ‘नेपाळचे रहिवासी रोजीरोटीसाठी देशातील विविध भागांत काम करतात. परंतु, अशा दुर्दैवी दुर्घटनेमध्ये त्यांचा बळी जाऊन त्यांच्या कुटुंबाची हानी होते. या मृतांच्या वारसांना भारत सरकार व राज्य सरकारने नुकसानभरपाई द्यावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’ (प्रतिनिधी)