फळभाज्या कडाडल्या; काकडीच्या दरात दुप्पट वाढ, आवक वाढल्याने पालेभाज्यांचे दर झाले कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 09:07 IST2024-12-20T09:06:15+5:302024-12-20T09:07:01+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे दर कमी झाले आहेत.

फळभाज्या कडाडल्या; काकडीच्या दरात दुप्पट वाढ, आवक वाढल्याने पालेभाज्यांचे दर झाले कमी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे दर कमी झाले आहेत. परंतु फरसबी, काकडी, तोंडली व इतर फळभाज्यांच्या दरांमध्ये वाढ होऊ लागली आहे. काकडीच्या दरामध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.
बाजार समितीत गुरुवारी ६३२ वाहनांमधून २,९५० टन भाजीपाल्याची आवक झाली. यामध्ये ६ लाख ९२ हजार जुडी पालेभाज्या आहेत. त्यामुळे पालेभाज्यांची खरेदी होईल. राज्याच्या काही भागातून पालेभाज्यांची आवक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे.
कोथिंबीरच्या २ लाख १२ हजार जुडीची आवक
पालकच्या २ लाख ३३ हजार जुडीची आवक झाली आहे. कोथिंबीरच्या २ लाख १२ हजार जुडीची आवक झाली. होलसेल मार्केटमध्ये कोथिंबीर ६ ते ८, मेथी ६ ते ८, पालक ५ ते ८ रुपये जुडी दराने विकली जात आहे. पालेभाज्यांचे दर कमी झाले असले तरी इतर भाज्यांचे दरही आठवड्यात वाढले आहेत. काकडीचे दर २० ते २६ वरून ४६ ते ६० रुपये किलो झाले आहेत. कारली २८ ते ३४ वरून ४० ते ४८, तोंडली २० ते ३४ वरून ३० ते ६० रुपये व फरसबीचे दर २६ ते ३६ वरून ३६ ते ५० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
भाजीपाला प्रतिकिलो
वस्तू १२ डिसेंबर १९ डिसेंबर
दुधी भोपळा १० ते १४ १६ ते २२
फरसबी २६ ते ३६ ३६ ते ५०
फ्लॉवर ७ ते १२ ८ ते १२
गवार ५० ते ६० ६० ते ८०
काकडी २० ते ३६ ४६ ते ६०
कारली २८ ते ३४ ४० ते ४८
ढोबळी मिर्ची २० ते ३६ ३० ते ४४
शेवगा शेंग १०० ते १६० १२० ते १८०
दोडका ३० ते ३६ ३८ ते ४४
टोमॅटो १२ ते २४ १२ ते २४
तोंडली २० ते ३४ ३० ते ६०
वाटाणा ६० ते ७० ६५ ते ८०
वांगी ८ ते १६ १६ ते २४