महिला-मुलींसाठी गर्भाशय कर्करोगविरोधी मोफत लसीकरण

By नारायण जाधव | Published: March 7, 2024 08:20 PM2024-03-07T20:20:00+5:302024-03-07T20:20:06+5:30

महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उपक्रम

Free vaccination against cervical cancer for women and girls | महिला-मुलींसाठी गर्भाशय कर्करोगविरोधी मोफत लसीकरण

महिला-मुलींसाठी गर्भाशय कर्करोगविरोधी मोफत लसीकरण

नवी मुुंबई : भारतात गर्भाशयमुखाच्या कर्करोगामुळे (सर्व्हायकल कॅन्सरमुळे) दर ८ मिनिटांनी एका स्त्रिचा मृत्यू होतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन कर्करोग होण्यापेक्षा त्याला प्रतिबंध घालणे केव्हाही चांगले, यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार यांच्यातर्फे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया निर्मित लस ९ ते १४ वयोगटांतील मुलींना महिला दिनाचे औचित्य साधून मोफत देण्यात येणार असल्याची पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत रामदास पाटील यांनी दिली.

यानुसार ८ मार्च २०२४ ते १४ मार्च २०२४ सकाळी १० ते ४ यावेळेत मोफत दिली जाणार आहे. पक्षाचे डॉक्टर सेल नवी मुंबई व कोकण विभागीय अध्यक्ष डॉ. संतोष खंबाळकर, महिला जिल्हाध्यक्ष सलुजा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील माथाडी हॉस्पिटल कोपरखैरणे व मंगल प्रभू नर्सिंग होम जुईनगर येथे ही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.या लसीकरणाकरिता नोंदणी सक्तीची आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. नोंदणीसाठी संपर्कः डॉ संतोष खंबाळकर यांच्याशी ९८७०३३३७६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Web Title: Free vaccination against cervical cancer for women and girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.