शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

मुंबईच्या समुद्रात चार नव्या तेल-वायू शोध विहिरी

By नारायण जाधव | Updated: April 9, 2023 20:11 IST

या प्रस्तावित विहिरी मुंबईच्या पूर्व किनारपट्टीपासून किनारपट्टी ११.३ किलोमीटर आणि दक्षिणेला जुहू बीचपासून १६.६ किलोमीटर लांब आहेत.

नवी मुंबई : ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने गुजरात आणि मुंबईच्या समुद्रात १४ नव्या तेल-वायू शोध विहिरी खोदण्याचा निर्णय घेतला आहे. यातील १० विहिरी गुजरातच्या हद्दीत, तर ४ विहिरी मुंबईच्या समुद्रात खोदण्यात येणार आहेत. या विहिरींपासून ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील फ्लेमिंगो अभयारण्यात येणाऱ्या देशी- परदेशी पक्ष्यांना धोका नसल्याचे सांगून सीआरझेड प्राधिकरणाने त्यांना सशर्त परवानगी देऊन याबाबतचा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे.

या प्रस्तावित विहिरी मुंबईच्या पूर्व किनारपट्टीपासून किनारपट्टी ११.३ किलोमीटर आणि दक्षिणेला जुहू बीचपासून १६.६ किलोमीटर लांब आहेत. ओएनजीसीच्या प्रस्तावानुसार प्रस्तावित विहिरींचे क्षेत्र पश्चिमेला समुद्रात ४,६२६.१९ चौरस किलोमीटर आहे.ओएनजीसीच्या प्रस्तावानुसार याठिकाणी ४ विहिरी खोदण्यात येणार असून सोबत, MB-OSHP २०१८ आणि MB-OSHP २०१८-ब या प्लॅटफॉर्मचे बांधकाम, या फलांटापासून सागरी पाइपलाइन टाकणे, विहिरींना हूकअप करणे, शिवाय फलाटांपासून किनारपट्टीवरील वांद्रे येथील प्रक्रिया केंद्रापर्यंत पाइपलाइन टाकण्यात येणार आहे.

केंद्रीय वने मंत्रालयाने घोषित केल्यानुसार महाराष्ट्रात ४,६०२ हेक्टरपेक्षा क्षेत्राचे दोन सागरी संरक्षित क्षेत्रे आहेत. यातील एक मालवण २,९१२ हेक्टर आणि दुसरे ठाणे- नवी मुंबईतील १,६९० हेक्टरचे फ्लेमिंगो अभयारण्य होय. मात्र, या दोन्ही अभयारण्यांना प्रस्तावित विहिरीत चालणाऱ्या कामांपासून कोणताही धोका नसल्याचे ओएनजीसीने म्हटले आहे. विहिरीपासून सर्वांत जवळ ठाणे फ्लेमिंगो अभयारण्य असून ते ५२.२८ किलोमीटर अंतरावर असून, मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांची किनारपट्टी जवळ आहे. मात्र, त्यांचा परिसरातील मच्छीमारांसह स्थानिकांच्या जीवनमानावर परिणाम होणार नाही. याशिवाय महाराष्ट्र शासन आणि मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटी या परिसरावर लक्ष ठेवून असल्याचे ओएनजीसीने म्हटले आहे.

...ही घ्या काळजीसीआरझेडने तेल विहिरींना परवानगी देताना ज्या अटी घातल्या आहेत. त्यामध्ये खोदकाम करताना घनकचरा, कोणतेही रसायने समुद्रात जाऊन तो दूषित होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. घातक कचऱ्याची वाहतूक आणि विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने आणि केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या नियमांप्रमाणेच करावी, बांधकामादरम्यान पर्यावरण व्यवस्थापन प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने राबवून समुद्र पर्यावरण आणि जलचरांचे संरक्षण करण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प