नवी मुंबई: मतदान केंद्राविषयी योग्य माहिती न मिळाल्याचा फटका सामान्य नागरिकांसह वनमंत्री गणेश नाईक यांनाही बसला. नाव न सापडल्याने दोन केंद्रांवर धावपळ करावी लागली.नवी मुंबईत सर्व निवडणुकांमध्ये गणेश नाईक सहपरीवार मतदान करत असतात. कोपरखैरणे शाळा क्रमांक ९४ मध्ये मतदान असायचे. यावेळेस त्यांचे नाव सेंट मेरी शाळेत असल्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबातील काहींचे मतदान शाळा क्रमांक ९४ व काहींचे सेंट मेरीमध्ये आले आहे. मतदान केंद्र शोधन्यासाठी नाईक कुटुंबाला अर्धा तास धावपळ करावी लागली.मतदान केंद्रावरील गोंधळाविषयी गणेश नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्री, आमदार कुटुंबातील सदस्यांच्या नावात घोळ असेल तर इतरांचे काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. याची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.
Web Summary : Forest Minister Ganesh Naik, along with citizens, struggled to locate his polling booth due to inaccurate information. The Naik family spent half an hour searching for their respective polling locations. Naik expressed strong dissatisfaction with the confusion and demanded an investigation into the matter.
Web Summary : वन मंत्री गणेश नाइक को गलत जानकारी के कारण मतदान केंद्र ढूंढने में परेशानी हुई. नाइक परिवार को मतदान केंद्र खोजने में आधा घंटा लगा. गणेश नाइक ने मतदान केंद्र पर हुई गड़बड़ी पर नाराजगी जताई और जांच की मांग की है.