शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

पाच नगरपालिकांवर राहणार महिलांचे वर्चस्व

By admin | Updated: October 6, 2016 03:45 IST

रायगड जिल्ह्यातील नऊ नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. महिला आरक्षणामुळे उरण, खोपोली, महाड, मुरुड आणि माथेरान या तब्बल पाच नगरपालिकांवर थेट महिलांचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील नऊ नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. महिला आरक्षणामुळे उरण, खोपोली, महाड, मुरुड आणि माथेरान या तब्बल पाच नगरपालिकांवर थेट महिलांचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. पेण, रोहा आणि श्रीवर्धन नगरपालिकेवर खुला गटातील स्त्री किंवा पुरुषांना संधी मिळणार आहे, तर अलिबाग नगरपालिकेवर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला अथवा पुरुषाचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे.नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने विविध राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीतील अडथळा दूर झाला आहे. जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांची मुदत येत्या कालावधीत संपुष्टात येत आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने त्या दिशेने तयारी सुरु केली आहे. प्रभाग रचना झाल्यानंतर अनेक प्रस्थापितांचे प्रभाग खालसा झाले होते. त्यानंतर नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचेच डोळे लागले होते. नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जाणार असल्याने बुधवारी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. अलिबाग नगरपालिकेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले. येथून महिला अथवा पुरुष निवडणूक लढवू शकतो. अलिबाग नगर पालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जाहीर होताच विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करुन आनंद साजरा केला. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात पुन्हा प्रशांत नाईक आहेत, हे स्पष्ट झाले.उरण नगर पालिकेवर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार आहे. खोपोलीत अनुसूचित जातीच्या महिलेच्या हाती सत्ता जाणार आहे. पेण, रोहा, श्रीवर्धन नगर पालिकेवर खुल्या गटातील स्त्री-पुरुषांना संधी प्राप्त झाली आहे.रोहा - अष्टमी नगराध्यक्षपद खुलेरोहा : रोहा-अष्टमी नगरपरिषद अध्यक्षपदाकरिता सर्वसाधारण (खुले) आरक्षण जाहीर झाले आहे. या खुल्या आरक्षणामुळे शहरातील राजकीय समीकरण हमखास बदलणार आहे. असे असताना अध्यक्षपदाच्या तिकिटासाठी सत्ताधारी पक्षाबरोबर विरोध गटात देखील रस्सीखेच सामना रंगला आहे. सर्वपक्षीय नेत्याचे लक्ष असलेल्या अष्टमी नगराध्यक्ष पदासाठी बुधवारी सर्वसाधारण आरक्षण जाहीर होताच सर्व पक्ष राजकीय कामाला लागले आहेत. खुल्या प्रवर्गासाठीनांदगाव/ मुरु ड : मुरु ड नगराध्यक्षपद हे महिलांच्या खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली. आता महिला उमेदवारासाठी राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्या सौभाग्यवती मुग्धा दांडेकर यांचे नाव चर्चेत आहे, तर शिवसेनेकडून विद्यमान नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी व शेकापची युती होणार आहे हे जवळजवळ निश्चित झाले आहे. काँग्रेसने उमेदवार कोण हे अद्याप स्पष्ट के ले नाही.महाड नगराध्यक्षपद महिला राखीवमहाड : महाडचे नगराध्यक्षपद महिला राखीवसाठी जाहीर केल्यानंतर या पदासाठी काँग्रेस, शिवसेनेत बाशिंग बांधून तयार असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवारांचा हिरमोड झाला. सध्या महाड नगरपरिषदेत निर्विवाद वर्चस्व असलेल्या कॉँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी माजी आ. माणिक जगताप यांच्या सुकन्या स्रेहल जगताप यांचे नाव चर्चेत आहे. महाडमध्ये राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. शिवसेनेत माजी नगरसेविका दपमा शिपरकर, श्रध्दा आर्ते, नगरसेविका सुरेखा कांबळे यांची नावे चर्चेत आहेत. शहरप्रमुख दीपक सावंत यांच्या पत्नी शर्मिला सावंत यांचेही नाव यासाठी घेतले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व शेकाप आघाडीतर्फे विद्यमान नगरसेविका नीला मेहता या देखील नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार होऊ शकतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात केली जात आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात होणार आहे.