शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
4
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
5
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
6
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
7
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
8
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
9
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
10
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
11
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
12
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
13
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
14
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
15
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
16
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
17
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
18
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
19
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
20
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा

उलवेतून पाच बालकामगारांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 6:19 AM

आॅपरेशन ‘मुस्कान’ अंतर्गत गुन्हे शाखा पोलिसांनी उलवे येथून पाच बालकामगारांची सुटका केली आहे. तर त्यांना नोकरीवर ठेवून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल झाले.

नवी मुंबई : आॅपरेशन ‘मुस्कान’ अंतर्गत गुन्हे शाखा पोलिसांनी उलवे येथून पाच बालकामगारांची सुटका केली आहे. तर त्यांना नोकरीवर ठेवून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल झाले.नवी मुंबई पोलिसांकडून आॅपरेशन ‘मुस्कान’ अंतर्गत हरवलेल्या बालकांच्या शोधमोहिमेसह बालमजुरांच्या शोधासाठीही प्रयत्न होत आहेत. या दरम्यान, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला उलवे परिसरात बालकामगार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण व कामगार आयुक्त विभागाचे दुकान निरीक्षक सुधीर देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील व्यावसायिकांची झाडाझडती घेण्यात आली, त्याकरिता सहायक निरीक्षक सुनीता भोर, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर आदींचे पथक करण्यात आले होते. त्यांच्या पाहणीमध्ये उलवे सेक्टर-५ ठिकाणी बालकामगार असल्याचे आढळून आले. सदर बालकांची सुटका करून त्यांना नोकरीवर ठेवणाºया व्यावसायिकांवर न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शाहीद जाहीद, भीमा नाथ, शिवरामन यादव, राजीत यादव, अनारुल बिलाल शेख अशी त्यांची नावे आहेत. टायर्स, स्नॅक सेंटर, वडापाव सेंटर, भाजीपाला विक्री केंद्र असा त्यांचा व्यवसाय असून, त्या ठिकाणी अल्पवयीन मुलांना कामगार म्हणून ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडून सुटका केलेल्या पाच बालकामगारांपैकी दोघे उत्तर प्रदेशचे, एक बिहारचा, एक मध्य प्रदेशचा तर एक राजस्थानचा आहे. त्या सर्वांना बालकल्याण समितीमार्फत त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी