शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

दिघा येथे आगडोंब; दोन दुकाने खाक, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 02:38 IST

दिघा येथे लागलेल्या आगीमध्ये अवैध हुक्का पार्लरसह इतर तीन दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबई : दिघा येथे लागलेल्या आगीमध्ये अवैध हुक्का पार्लरसह इतर तीन दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आगीत तिघे जण जखमी झाले असून, इमारतीजवळ उभी असलेली वाहनेही जळून खाक झाली आहेत. तळमजल्यावरील दुकानात लागलेली आग वरच्या मजल्यापर्यंत पसरली.गणपती पाडा परिसरातील एक मजली इमारतीमध्ये मंगळवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्या ठिकाणी असलेल्या मयूर टाइल्स या मार्बल दुकानाच्या पहिल्या मजल्यावर मिलियन्स नावाचा हुक्का पार्लर चालवला जात होता. सुमारे एक महिन्यापूर्वीच हा अवैध हुक्का पार्लर त्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता, असेही समजते. मार्बलच्या दुकानालगतच एक सायबर कॅफेही चालवला जात होता. मंगळवारी सकाळी संपूर्ण इमारत पेटल्याने तिथल्या हुक्का पार्लरसह सायबर कॅफे व मार्बलचे दुकान जळून खाक झाले.तळमजल्यावरील सायबर कॅफेमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. ही आग वरच्या मजल्यापर्यंत पसरल्याने हुक्का पार्लरमधील साहित्यही पेटू लागले. त्यामुळे भयभीत झालेल्या कामगारांनी बचावासाठी वरच्या मजल्यावरून उड्या मारल्या. त्यामध्ये तिघे जण जखमी झाले असून ते काही प्रमाणात भाजलेही आहेत.आगीच्या ज्वाळांमुळे इमारतीखाली उभी असलेली एक कार व दोन दुचाकी अशी तीन वाहनेही जळून खाक झाली आहेत. दरम्यान, आग अधिक पसरत असल्याने त्यापासून काही अंतरावरील पेट्रोलपंपलाही धोका निर्माण झाला होता. यामुळे त्या ठिकाणची इतर वाहने जेसीबीच्या मदतीने बाजूला करण्यात आली. तर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण इमारत जळून खाक झाली होती.दुर्घटना रात्रीच्या वेळी घडली असती, तर त्यामध्ये मोठी जीवितहानी झाली असती अशी भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्या ठिकाणी अवैधरीत्या हुक्का पार्लर चालवला जात असतानाही त्याकडे डोळेझाक केली जात होती. परिणामी, रात्रीच्या वेळी परिसरातील तरुण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमून नशा करत बसलेले असतात. अशा वेळी आग लागली असती, तर त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता.मंगळवारी लागलेली आग हुक्का पार्लरमुळेच लागल्याचीही शंका परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या दुर्घटनेप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.रस्त्यावरील वाहनांनी घेतला पेटआग लागलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच पेट्रोलपंप होता. त्यामुळे आग अधिक पसरल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशातच रस्त्यावरील वाहने पेट घेऊ लागल्याने त्यांच्या स्फोटातून आग सर्वत्र पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. आग आटोक्यात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.तळमजल्यावरील दुकानात आग लागल्याने ती वरच्या मजल्यापर्यंत पसरल्याने तिथली तीन दुकाने जळाली आहेत. आगीच्या वेळी वरच्या मजल्यावर अडकलेल्या व्यक्तींनी बचावासाठी खाली उड्या मारल्याने तिघे जण जखमी झाले आहेत. त्या ठिकाणी हुक्का पार्लरही चालवला जात होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.- सतीश गोवेकर,सहायक पोलीस आयुक्त

टॅग्स :fireआगNavi Mumbaiनवी मुंबई