शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यामुळे दोन ठिकाणी आग

By admin | Updated: November 12, 2015 02:09 IST

दिवाळीतील फटाक्यांमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला मार्केटमधील बदामच्या गाळ्याला मंगळवारी रात्री आग लागली. गाळ्यांवरील शेड जळून खाक झाले

नवी मुंबई : दिवाळीतील फटाक्यांमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला मार्केटमधील बदामच्या गाळ्याला मंगळवारी रात्री आग लागली. गाळ्यांवरील शेड जळून खाक झाले. बुधवारी सकाळी तुर्भे डम्पिंग ग्राउंडवरील वृक्षाच्या फांद्या व पाल्याला आग लागली सायंकाळपर्यंत ही आग विझविण्याचे काम सुरू होते. मसाला मार्केटमधील जी ३६ गाळ्याच्या छताला फटाक्यामुळे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. मार्केटध्ये रॉकेट उडविण्यात येत होती. त्यामधील एक छतावर पडल्याने तेथील बदामाचा भुसा व लागडांनी तत्काळ पेट घेतला. आगीमध्ये टेरेसवर टाकलेले शेड पूर्णपणे जळून खाक झाले आहे. बदाम फोडण्याची तीन मशीन जळून गेल्या आहेत. छतावर ठेवलेल्या भुशाच्या गोणी जळून खाक झाल्या आहेत. व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे छतावर लाकडी शेड टाकल्यामुळे पाच गाळ्यांवरील शेड जळून गेल्या. नवी मुंबई, ठाण्यामधील अग्निशमन दलाच्या वाहने तत्काळ घटनास्थळी जाऊन आग विझविण्यास सुरुवात केली. वेळेत आग विझविली नसती, तर पूर्ण जी विंग जळून खाक झाली असती. आग लागलेल्या दुकानासमोरच फटाक्यांचे स्टॉल आहेत. आगीमुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली होती. तत्काळ सर्व फटाके बाजूला काढून ठेवण्यात आले. महापालिकेच्या तुर्भे डम्पिंग ग्राउंडवरही सकाळी फटाक्यामुळे आग लागली. शहरातील वृृक्षांची छाटनी केल्यानंतर निर्माण होणारा कचरा एक कोपऱ्यात टाकण्यात येतो. रोज जवळपास २० टन फांद्या व त्याचा पाला डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात आहे. आगीमध्ये हा कचरा पूर्णपणे जळून गेला आहे. नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, परंतु प्रचंड धूर असल्यामुळे आग विझविण्यात अडथळे निर्माण होत होते. जेसीबीच्या सहाय्याने माती टाकत अग्निशमन दलाची वाहनांना मार्ग करून देण्यात आला. सायंकाळपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. तर फटाका स्टॉल जळाले असतेबाजारसमितीमध्ये आग लागलेल्या गाळ्यासमोर नाल्याच्या कडेला शहरातील फटाके विक्रेत्यांचे स्टॉल्स आहेत. गाळ्यात ठेवलेला भुसा व शेडच्या लागडांनी पेट घेतला. आगीच्या ठिणग्या उडू लागल्यामुळे, फटाका स्टॉल्सना आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. फटाके विक्रेत्यांनी तत्काळ सर्व माल बाजूला काढून ठेवण्यास सुरुवात केली, परंतु अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दक्षता दाखविल्यामुळे मोठी दुर्घटना घडली.