पनवेलमध्ये वैदू नगर झोपडपट्टीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 09:38 IST2018-12-31T09:21:01+5:302018-12-31T09:38:54+5:30
पनवेल तक्का येथील वैदू नगर झोपडपट्टीला सोमवारी (31 डिसेंबर) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पनवेलमध्ये वैदू नगर झोपडपट्टीला भीषण आग
पनवेल - पनवेल तक्का येथील वैदू नगर झोपडपट्टीला सोमवारी (31 डिसेंबर) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या ठिकाणी आग लागण्याची ही दुसरी घटना आहे.
घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेसह कळंबोली, खारघर, वाशी या अग्निशामन दलाचे बंब या ठिकाणी आले होते. आग इतकी भीषण होती की काही मिनिटात अनेक झोपडया जळून खाक झाल्या. याची धग दुसरीकडे पोहचू नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास करत असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी अनिल जाधव यांनी दिली आहे.