शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

पोलिसांच्या चकमकीत फैयाज शेख जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 6:11 AM

राज्याच्या विविध भागांत ९० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या फैयाज शेखला अखेर गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.

नवी मुंबई : राज्याच्या विविध भागांत ९० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या फैयाज शेखला अखेर गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.मागील दीड वर्षापासून तो नवी मुंबई पोलिसांना चकवा देत होता. या दरम्यान दोन वेळा त्याने पोलिसांवर गोळीबार करून पळ काढला होता. अखेर खालापूर येथील गावात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तो व त्याचा साथीदार पोलिसांच्या हाती लागला आहे.शुक्रवारी फैयाज आणि त्याचे दोन साथीदार गुन्ह्याच्या उद्देशाने खारघर परिसरात आले होते. त्या ठिकाणी जबरी चोरीचे दोन गुन्हे केल्यानंतर एका कारचालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याची कार पळवून नेली होती. त्यानंतर फैयाज हा त्याच्या साथीदारांसोबत खालापूर येथील नढाळ गावामध्ये लपला होता. याची माहिती मिळताच आयुक्तसंजय कुमार, सहआयुक्त सुरेशकुमार मेकला, गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, अशोक दुधे, सहायक आयुक्त अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आलेहोते. त्यामध्ये गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संदीपान शिंदे, शिरीषपवार, अजयकुमार लांडगे, प्रदीप तिदार, विजय कादबाने, सहायक निरीक्षक राहुल राख, विजय चव्हाण, नीलेश माने, प्रतापराव कदम, उपनिरीक्षक विक्रांत थारकर, योगेश वाघमारे, नितीन शिंदे आदींचा समावेश होता.पोलिसांनी शनिवारी सकाळी ६.३० वाजता फैयाजच्या साथीदाराच्या सखाराम पवारच्या घराला घेराव घातला; या वेळी सखारामने फैयाजला सतर्क केल्याने त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने बुलेटप्रूफ जॅकेट घातल्याने समोरून गोळी लागूनही वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार व विजय कादबाने यांचे प्राण वाचले. अखेर पोलिसांनीही त्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या असता, एक गोळी फैयाजच्या पायाला लागल्यानंतरही त्याने साथीदारासह घराच्या खिडकीतून पळ काढला. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून फैयाज व त्याचा साथीदार हाजी पिर मोहमद शेख (३१) याला पकडले. त्यांना उपचारासाठी कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. तर फैयाजला पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी सखाराम पवारला अटक करण्यात आली आहे.>दीड वर्षापासून पोलीस मागावरसोनसाखळी चोरी, जबरी चोरी, लूट, हत्येचा प्रयत्न, मकोका असे ९० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार फैयाज शेख याला अखेर अटक करण्यात आली आहे. त्यापैकी ५८ गुन्हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील असून, या प्रकरणी नवी मुंबई पोलीस दीड वर्षापासून त्याच्या मागावर होते.या दरम्यान तो सतत राहण्याचे ठिकाण बदलून, तसेच वेशभूषा करून पोलिसांना चकवा देत होता. त्यानंतरही तीनदा पोलिसांनी त्याला घेरले होते. या दरम्यान गुजरात व वसई येथे त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करून पळ काढला होता. त्यानंतर आता केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली.