शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 15:52 IST2018-09-02T15:49:18+5:302018-09-02T15:52:55+5:30

शेतक-यांच्या मालाला योग्य दर मिळाला पाहिजे. याबाबत सरकार सकारात्मक आहे. लवकरच यासंदर्भात सर्वसमावेसक धोरण तयार केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशी येथे दिली. 

farmers will get fair rate to their crops -Chief Minister Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई - शेतक-यांच्या मालाला योग्य दर मिळाला पाहिजे. याबाबत सरकार सकारात्मक आहे. लवकरच यासंदर्भात सर्वसमावेसक धोरण तयार केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशी येथे दिली. श्री कुलस्वामी को.ऑप क्रेडीट सोसायटीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. मराठा व धनगर समाजाला आरक्षण देणारच, असे स्पष्ट करुन तरुणांनी नोक-यांच्या मागे न लागता उच्च शिक्षण घेऊन नोक-या देणा-यांची भूमिका बजवावी, असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी मुंबै बॅंकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर, महापौर जयवंत सुतार, आमदार शरद सोनावणे,  सिडकोचे नवनियक्त अध्यक्ष प्रशांत ठाकुर, आमदार मंदा म्हात्रे, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: farmers will get fair rate to their crops -Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.