महापालिकेच्या शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या: राष्ट्रवादीची मागणी

By नारायण जाधव | Updated: February 8, 2024 18:14 IST2024-02-08T18:14:11+5:302024-02-08T18:14:43+5:30

खुल्या गटाची गुणमर्यादा ६५ टक्के कायम ठेवा

extend the deadline for filing municipal scholarship applications ncp demands | महापालिकेच्या शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या: राष्ट्रवादीची मागणी

महापालिकेच्या शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या: राष्ट्रवादीची मागणी

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये खुल्या गटासाठी पूर्वीप्रमाणे ६५ टक्के गुणांची मर्यादा ठेवण्याच्या मागणीसह शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने गुरुवारी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नवी मुंबई शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त नार्वेकर यांची भेट घेऊन शिष्यवृत्ती संदर्भात विविध मुद्यांसह शहरांतील सामान्य जनतेस भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्यांवरदेखील चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिले. याप्रसंगी जी. एस. पाटील, राजू देशमुख, प्रशांत पाटील, महादेव पवार, नितीन चव्हाण या पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: extend the deadline for filing municipal scholarship applications ncp demands