महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकायला हवी- भगत सिंह कोश्यारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 16:36 IST2020-01-15T16:36:55+5:302020-01-15T16:36:59+5:30
वाशी रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या उत्तराखंड भवनचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकायला हवी- भगत सिंह कोश्यारी
नवी मुंबई: महाराष्ट्रात राहता तर मराठी आलीच पाहिजे. त्यामुळे उत्तराखंडासह विविध राज्यातून आलेल्यांनी मराठी भाषा शिकायला हवे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज नवी मुंबईत केलं. वाशी रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या उत्तराखंड भवनचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आदि मान्यवर उपस्थित होते.
मराठी आणि उत्तराखंडाच्या पहाडी भाषेत बरेचसे साधर्म्य असल्याने उत्तराखंडातील नागरिकांना मराठी बोलणे फारसे अवघड नसल्याचा निर्वाळा राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी दिला. उत्तराखंड भवन मुंबईमध्ये बांधण्यात येत असल्याने आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे स्पष्ट करुन पर्यटन, उत्पादन, गुंतवणूकदारांसाठी या भवनात कार्यालय बनवणार असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांनी दिली. भवनात 40 खोल्या तयार केल्या करण्यात आल्या आहेत. यातील दोन खोल्या येथे उत्तरखंड मधून मुंबईत टाटा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णासाठी ठेवण्यात येणार आहेत.