शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

कोकण भवनला अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 2:57 AM

स्वच्छ भारत अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेला बेलापूरमधील प्रवेशद्वाराच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात अपयश आले आहे.

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेला बेलापूरमधील प्रवेशद्वाराच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात अपयश आले आहे. कोकण भवन परिसराला समस्यांचा विळखा पडला आहे. उद्यानाच्या भूखंडावर अनधिकृत मंडई सुरू आहे. झोपड्यांची संख्या वाढत असून, या परिसरामध्ये अमली पदार्थांचीही विक्री होऊ लागली आहे.नवी मुंबईमधील सर्व प्रमुख शासकीय कार्यालये सीबीडी रेल्वेस्टेशन परिसरामध्ये आहेत. कोकण विभागीय आयुक्तालय, पोलीस आयुक्तालय, सिडको मुख्यालय, केंद्रीय सदन, सीजीओ कॉप्लेक्स, कपास भवन, रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, कोकण रेल्वे व पालिकेचे जुने मुख्यालय ही सर्व कार्यालये येथे असून, रोज आठ ते दहा हजारांपेक्षा जास्त नागरिक या ठिकाणी भेट देत असतात. कोकण आयुक्तालयामुळे मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंतचे लोकप्रतिनिधी, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी येथे येत असतात. गतवर्षी स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईचा राज्यात प्रथम व देशात आठवा क्रमांक आला होता. पहिल्या दहामध्ये सहभाग असलेले राज्यातील एकमेव शहर होते. स्मार्ट सिटी म्हणून नवी मुंबईची ओळख आहे; परंतु कोकण भवन परिसराची झालेली दुरवस्था पाहिली की, शहराच्या प्रतिमेला तडा जात आहे. महामार्गाला लागूनच असलेल्या उद्यानाच्या भूखंडावर अनधिकृतपणे मंडई सुरू आहे. मासेविक्रेत्यांनी पदपथावरच व्यवसाय सुरू केला आहे. विक्रेते खराब झालेला भाजीपाला तेथील नाल्यामध्ये टाकत आहेत. महापालिकेचे प्रवेशद्वार असलेला परिसर अस्वच्छ झाला आहे. शहरात येणाºया नागरिकांना सर्वप्रथम उद्यानाच्या भूखंडावरील अतिक्रमण व अनधिकृत फेरीवालेच दिसू लागले आहेत.सीबीडी उड्डाणपुलाच्या खाली असलेले सर्कल मद्यपींचा अड्डा बनला आहे. रात्री येथेच अनेक जण मद्यपान करत असतात. दारूच्या बाटल्यांचा ढीग व कचरा पाहावयास मिळत आहे. पुलाखाली, ‘येथे वाहने उभी करण्यास मनाई आहे’चा फलक लावण्यात आला आहे; परंतु या फलकाला लागूनच वाहने उभी केली जात आहेत. कोकण भवन व महामार्ग यांच्यामध्ये असलेल्या नाल्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पाण्याचा अजिबात निचरा होत नाही.पावसाळ्यात नाल्यात साठलेले पाणी कोकण भवन परिसरामध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकण भवनच्या मागील बाजूला अनधिकृतपणे डेब्रिज टाकले जात आहे. डेब्रिजचे ढीग उचलले जात नाहीत. मेट्रो लाइनला लागून टाटानगर झोपडपट्टी वसली आहे. येथील अतिक्रमण हटविण्यास सिडकोला अपयश आले आहे. प्रत्येक वर्षी येथील झोपड्या हटविल्या जातात. सिडकोच्या पथकाने पाठ फिरविली की लगेच पुन्हा अतिक्रमण जैसे थे होत आहे.कोकण भवनच्या खिडकीमधून दिसणाºया झोपड्या पाहून येथे येणाºया नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका, सिडको व पोलीस प्रशासन हा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात अपयशी ठरले आहेत.>गांजाविक्रीचा अड्डाकोकण भवनच्या मागील बाजूला असलेल्या झोपडपट्टीमध्ये गांजाविक्री केली जात असल्याचे यापूर्वी अनेक वेळा निदर्शनास आले आहे. दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे गांजा प्रकरणी राजू रामलाल श्रेष्ठ या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून तब्बल एक लाख तीन हजार रुपये किमतीचा गांजा सापडला. हा आरोपी कोकण भवनच्या मागील बाजूला राहात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकानेही या परिसरात धाड टाकून गांजा जप्त केला होता.>सिडकोचेही अपयशनवी मुंबईमधील जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. पनवेल, नवी मुंबई परिसरामध्ये सिडको अतिक्रमण विरोधी कारवाई करून, भूखंड अतिक्रमणमुक्त करत आहे; परंतु स्वत:च्या मुख्यालयासमोर कोकण भवन सारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाला लागून असलेले भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात सिडको प्रशासनास अपयश आले असून, सिडकोच्या कार्यशैलीवर व कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.>ंडेब्रिजचे ढिगारे जैसे थेकोकण भवनच्या मागील बाजूला १००पेक्षा जास्त डंपरमधून डेब्रिज खाली केले आहे. आयुक्तालयामध्ये येणाºया नागरिकांना खिडकीमधूनही डेब्रिजचे ढिगारे दिसत आहेत. बांधकामाचा हा कचरा उचलण्याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करत आहे.>कोकण भवन परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेच्या वतीने नियमित कारवाई केली जात आहे. यापुढेही कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे.- शशिकांत तांडेल,विभाग अधिकारी,बेलापूर