खळबळजनक! खांदेश्वरमध्ये डमी हॅन्ड ग्रॅनाईड सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 11:09 IST2023-05-23T11:09:01+5:302023-05-23T11:09:27+5:30
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेंभोडे गावाजवळ एका शेळी चालकाला हॅन्ड ग्रॅनाईड झाडीझुडपात दिसून आले.

खळबळजनक! खांदेश्वरमध्ये डमी हॅन्ड ग्रॅनाईड सापडले
मयुर तांबडे
नवीन पनवेल - खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेंभोडे गावाजवळील क्रिकेटच्या मैदानातील झाडीझुडपात 2 डमी हॅन्ड ग्रॅनाईड 22 मे रोजी सायंकाळच्या सुमारास सापडले. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती.
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेंभोडे गावाजवळ एका शेळी चालकाला हॅन्ड ग्रॅनाईड झाडीझुडपात दिसून आले. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. ताबडतोब खांदेश्वर पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर बीडीडीएसला याबाबत कळवण्यात आले. त्यांनी हॅन्ड ग्रॅनाईड ताब्यात घेतले असता ते प्लास्टिक कोटिंग डमी असल्याचे समोर आले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.