शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

ताणतणावामुळे मुंबईकर हृदयविकाराच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 05:22 IST

बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती, बदललेल्या सवयी मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरत आहेत. जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार यात दहा हजार मुंबईकरांशी संवाद साधण्यात आला, यात मुंबईकरांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई  - बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती, बदललेल्या सवयी मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरत आहेत. जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार यात दहा हजार मुंबईकरांशी संवाद साधण्यात आला, यात मुंबईकरांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुंबईकर हृदयविकाराच्या उंबरठ्यावर असल्याची चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.२०१६ ते २०१८ या काळात एकूण दहा हजार ५९५ जणांची लिपिड प्रोफाइल चाचणी करण्यात आली. त्यांच्यापैकी ६६ टक्के पुरुष होते, तर ३४ टक्के महिला होत्या. त्यांना हृदयविकाराचा धोका कितपत आहे,हे या तपासणीत शोधण्यातआले.या व्यक्तींपैकी ३० टक्क्यांहून अधिक व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी अधिक होती. त्यांच्यापैकी १८ टक्के पुरुष होते, तर १२ टक्के महिला होत्या. या अभ्यासानुसार ३६-५० या वयोगटातील महिलांना अधिक धोका आहे, म्हणजेच १८ टक्के महिलांना हा धोका जास्त होता तर पुरुषांमध्ये हे प्रमाण दहा टक्के होते.तसेच, पाच हजार ०२४ व्यक्तींची एलडीएल कोलेस्ट्रॉल चाचणी करण्यात आली. ते तुमच्या रक्तवाहिन्यांच्या कडांवर साचते. त्यामुळे गुठळ्या तयार होऊ शकतात. एलडीएलची पातळी जास्त असेल, तर अचानक रक्ताची गुठळी तयार होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.महत्त्वाचा मुद्दा हा की, ज्या ३२ टक्के महिलांची तपासणी करण्यात आली होती, त्यांच्यापैकी २१ टक्के महिलांमध्ये एलडीएलची कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त होती. याविषयी, हृदयविकारतज्ज्ञ डॉ. प्रतीक सोनी यांनी सांगितले की, हृदयाच्या रक्तवाहिनीचा विकार होण्यासाठी आहार, जीवनशैली, पर्यावरणीय घटक कारणीभूत असतात. अतिरिक्त तणाव, व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार हे घटक कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीपेक्षा हृदयासाठी अधिक घातक असतात.व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली कारणीभूतआजच्या काळात आपल्याला स्वत:साठी म्हणून फार कमी वेळ असतो. तरुण पिढीचे लक्ष त्यांच्या करिअरवर केंद्रित असते, त्यामुळे ते आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे २०-४० या वयोगटात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. याआधी ४० वर्षांवरील व्यक्तीला हृदयविकार झाल्याचे निदर्शनास येत असे; पण आता व्यायामाचा अभाव आणि बैठ्या जीवनशैलीमुळे आरोग्याला असणारे अपाय वाढले आहेत. कामाचे अतिरिक्त तास, प्रवास आणि तणाव यामुळे रुग्णांना रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, थायरॉइड आणि आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होतात. दिवसाला केवळ ३० मिनिटे व्यायाम केला तरी रक्तदाब कमी होतो आणि हृदयावरील ताणही कमी होतो. त्याचप्रमाणे त्यामुळे उपयुक्त एचडीएलमध्ये वाढ होते. - डॉ. रोहित शहापूरकर, हदयविकारतज्ज्ञ

टॅग्स :newsबातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स