शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

सावत्रांच्या अत्याचाराला कंटाळून दश झाला बेपत्ता

By admin | Updated: July 18, 2015 23:43 IST

सावत्र आईसह तिची आई, बहिण व वहिनीने १२ वर्षीय दश खानझोडेवर केलेल्या अमानुष अत्याचाराला कंटाळून तो गेल्या २ जुलै पासून आसनागाव येथून बेपत्ता झाला असून कल्याण

- राजू काळे,   भार्इंदरसावत्र आईसह तिची आई, बहिण व वहिनीने १२ वर्षीय दश खानझोडेवर केलेल्या अमानुष अत्याचाराला कंटाळून तो गेल्या २ जुलै पासून आसनागाव येथून बेपत्ता झाला असून कल्याण रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही अत्याचाराची घटना कसाऱ्याच्या कोळीपाडा परिसरात घडली असून तेथील लोकांनी दशच्या जीविताबाबतच संशय व्यक्त केला आहे.दशचे वडील रामदास यांनी त्याला शिक्षणासाठी नाशिक येथे ठेवले होते. त्याच्या संगोपनासह स्वत:च्या एकाकी जीवनाला जोडीदार असावा, यासाठी शेजारील एका व्यक्तीच्या मध्यस्थीने त्यांचा २०१४ मध्ये लता दत्तात्रय जाधव हिच्यासोबत विवाह करुन दिला. पूर्वी विवाह होऊन ती नाशिक येथे राहण्यास गेली होती. परंतु, ती तेथे नांदत नसल्याने तिला रामदास यांच्या घरी देण्यात आले. ती आल्यानंतर त्याने दशला नाशिकहुन कसाऱ्यात आणून स्थानिक शाळेत दाखल केले. त्यानंतर त्याची सावत्र आई लता, तिची आई शैला, बहिण मालिनी व वहिनी अस्मा विष्णू जाधव यांनी त्याला घरातील काम करण्यास भाग पाडले. खेळण्या-बागडण्याच्या वयात त्याला चौघींचा अत्याचार सहन करावा लागत असे. त्याच्या हाता-पायावर चटके देऊन डोक्यावरील एका बाजूचे केस कापून पायाला जखमा करुन त्याला विद्रुपतेच्या दारी लोटण्यास सुरुवात केली. शाळेत दाखल केल्याचे त्याचे आईवडील सांगत असले तरी या अवस्थेत तो कोणत्या शाळेत जात होता, यावरही शेजाऱ्यानी शंका व्यक्त केली आहे. तो २ जुलै रोजी लतासोबत आसनगाव येथे गेला असता तेथून तो बेपत्ता झाल्याचे कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे. त्याला मारु नका, पुन्हा नाशिकच्या शाळेत पाठवा, अशी विनंती त्यांना केल्याचे लताचे चुलते चंद्रकांत जाधव यांनी लोकमत प्रतिनिधीला सांगून तसा जबाब पोलिसांना दिला आहे. परंतु, त्यांनीही दशलाच दोषी ठरवून जाधव यांच्या विनंतीला धुडकावले.ग्रामस्थांनी मांडले वास्तवदशवरील अत्याचाराबाबत शेजाऱ्यांनी कसारा रेल्वे पोलिसांत लेखी तक्रार केली आहे. त्याची अवस्था पळून जाण्यासारखी नसताना तो नेमका कुठे गेला, यावर ग्रामस्थ शंका व्यक्त करीत आहेत. याबाबत ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक अविनाश अंबुरे यांनी सांगितले की, घटनेची माहिती कसारा पोलिसांसह कल्याण रेल्वे पोलिसांना दिली असून ते त्याचा तपास करीत आहेत.