शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
6
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
9
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
10
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
11
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
12
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
13
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
14
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
15
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
16
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
17
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
19
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
20
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश

संरक्षण भिंत कोसळल्याने रबाळेत वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 02:14 IST

रबाळे एमआयडीसी मार्गावरील बंजारा वाडी ते आंबेडकर नगर येथे सिमेन्स कंपनीच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. या कामाचा फटका शेजारून जाणाऱ्या सर्व्हिस रोडला बसला आहे

नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी मार्गावरील बंजारा वाडी ते आंबेडकर नगर येथे सिमेन्स कंपनीच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. या कामाचा फटका शेजारून जाणाऱ्या सर्व्हिस रोडला बसला आहे. मुसळधार पावसात हा रस्ता अचानक खचल्याने या मार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली. दरम्यान, कामात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल महापालिकेने सिमेन्स कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.सिमेन्स कंपनीच्या मागील बाजूस गेल्या अनेक दिवसांपासून रबाले आंबेडकर नगर रस्त्यालगत संरक्षण भिंतीचे काम सुरु आहे. या भिंतीलगत आरसीसी रिटेर्निंग वॉलचे बांधकाम सुरु होते. दरम्यान, दोन दिवसांपासून कोसळणाºया मुसळधार पावसामुळे बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले. त्याचा अतिरिक्त दाब निर्माण झाल्याने लगतचा रस्ता अचानक खचला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या घटनेचे वृत्त समजताच एमआयडीसीचे उपअभियंता यशवंत मेश्राम यांच्यासह महापालिकेचे घणसोली विभाग अधिकारी दत्तात्रेय नागरे, स्थापत्य विभागाचे उपअभियंता वसंत पडघम, कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे, जितेंद्र रावल, अतिक्रमण विभागाचे प्रमुख रोहित ठाकरे आदींनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. यावेळी सिमेन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी धिंडे हे सुध्दा उपस्थित होते. पाहणीनंतर रस्त्यावरील डेब्रिज बाजुला करून वाहतूक सुरू करण्यात आली. या कामासाठी तब्बल चार तासांचा कालावधी लागला. दरम्यान, विशेष म्हणजे याअगोदर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधित ठेकेदाराला दोन वेळा नोटीस बजावली होती. त्यानंतरही भर पावसात काम सुरूच ठेवले होते. याची गंभीर दखल महापालिकेने घेतली असून असा प्रकार पुन्हा घडल्यास संबंधित कंपनीच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे विभाग अधिकारी दत्तात्रेय नागरे यांनी स्पष्ट केले आहे.