शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

वाहन चालकाची परीक्षा फक्त औपचारिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 3:59 AM

चालकांचे कौशल्य कागदावरच : नवी मुंबई आरटीओपुढे चाचणीसाठी जागेची परवड

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : वाहनांचा चालवण्याचा परवाना देण्यापूर्वी आरटीओकडून चालकाचे कौशल्य योग्यरीत्या तपासले जात नाही. यामुळे बेशिस्त व कामचलाऊ चालकांचे प्रमाण शहरात वाढल्याचे दिसून येत आहे. चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असून, त्याला आळा घालण्यासाठी परवाना देण्यापूर्वी चालकांचे कौशल्य तपासले जाणे गरजेचे बनले आहे.

रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी काही वर्षांपासून शासनाकडून पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता बेशिस्त चालकांवर धडक कारवाईच्या सूचना वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सतत कारवाया करून बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईच्या मोहीम राबवल्या जात आहेत; परंतु बेशिस्त चालकांच्या मुळापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न अद्यापपर्यंत झालेले नाही. बहुतांश चालकांच्या हाती सहज प्रक्रियेतून चालक परवाना आल्याने रस्त्यावर गर्दीत वाहन चालवताना त्यांचा गोंधळ उडताना दिसून येतो. त्यामुळे चालक परवाना देण्यापूर्वी संबंधिताचे वाहन चालवण्याचे कौशल्य बारकाई तपासणे आवश्यक आहे, तरच वाहतुकीच्या नियमांना शिस्त लागून अपघातांच्या घटनांना आळा बसणे शक्य आहे. नेमके याच बाबीकडे शासनासह आरटीओचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे केवळ औपचारिकता म्हणून चाचणी घेऊन चालक परवाना देण्याची कार्यपद्धती सद्यस्थितीला नवी मुंबई आरटीओ राबवत आहे.नवी मुंबई आरटीओकडून एपीएमसीमधील उपलब्ध मोकळ्या जागेत दुचाकी व कार चालकांची चाचणी घेतली जाते. याकरिता दोन ८० मीटरच्या ट्रॅकवर कार पुढे नेवून रिव्हर्स मागे आणायला सांगितले जाते. वाहन चालक परवान्यासाठी ही पद्धत अत्यंत दुर्मीळ झाली असून सध्याची रस्त्यावरील परिस्थिती पाहून त्यात सुधाराची गरज निर्माण झालेली आहे. केवळ सरळ मार्गे पुढे मागे कार चालवून दाखवताना प्रत्यक्षात रस्त्यावर चालकाला जे कौशल्य दाखवावे लागते, हे त्याठिकाणी तपासले जात नाही. यामुळे केवळ औपचारिकता म्हणून आरटीओकडून चालकांची चाचणी घेतली जात असल्याचा आरोप आहे. वाहनचालक परवाना मिळण्यापूर्वी शहरांतर्गतचे रस्ते व महामार्गावर दिवसा अथवा रात्री वाहन चालवताना कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल याचीही माहिती असणे आवश्यक आहे.वाहनचालक परवान्याची चाचणी प्रक्रिया रस्त्यावरील परिस्थितीला आधारित असली पाहिजे. मात्र, थोड्या फार पैशांसाठी आरटीओकडून कोणाच्याही हाती चालक परवाना टेकवला जात आहे. यामुळे वेगवेगळे रस्ते, महामार्ग यावरील परिस्थितीपासून अज्ञान अपरिपक्व चालकांमुळे अपघातांच्या घटना घडत आहेत.- विनय मोरे, प्रवक्ता, सारथी सुरक्षा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई