पनवेलमध्ये डबल मर्डर ! घरातून घुसून अज्ञातानं केली सासू-सुनेची तलवारीनं वार करुन हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 15:06 IST2017-10-10T14:55:59+5:302017-10-10T15:06:48+5:30
पनवेलमध्ये तलवारीनं वार करुन दोन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक समोर आली. अज्ञातांनी घरात घुसून सासू-सुनची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हत्या करण्यामागील कारण अस्पष्ट आहे.
_201707279.jpg)
पनवेलमध्ये डबल मर्डर ! घरातून घुसून अज्ञातानं केली सासू-सुनेची तलवारीनं वार करुन हत्या
नवी मुंबई - पनवेलमध्ये तलवारीनं वार करुन दोन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक समोर आली. अज्ञातांनी घरात घुसून सासू-सुनची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हत्या करण्यामागील कारण अस्पष्ट आहे. पनवेलमधील नांदगाव येथील हा धक्कादायक प्रकार आहे. मंगळवारी(10 ऑक्टोबर) दिवसाढवळ्या ही हत्या करण्यात आल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हत्येबाबतची माहिती समोर आली. दरम्यान, हल्लेखोर फरार झाले आहेत.