शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

आमदारकीसाठी आग्रह धरू नका, देवेंद्र फडणवीसांनी सांगितला इच्छुकांचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 07:00 IST

देवेंद्र फडणवीस; सर्वांसाठी मंत्र्यांच्या सीट नाही

वैभव गायकर

पनवेल : राज्यपाल नियुक्त बारा आमदारांसाठी बाराशे जणांचे बायोडाटा माझ्याकडे आले आहेत. काही जागा आपल्याला शिवसेनेलाही द्याव्या लागतील. मंत्रिमंडळ विस्तारातही जागा नाहीत, सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. आमदारकीसाठी आग्रह न धरता त्यागाची तयारी ठेवा, असा सबुरीचा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील इच्छुकांना दिला.

येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित भाजपच्या  प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप फडणवीस यांच्या भाषणाने झाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, प्रदेश प्रभारी सी. टी. रवी, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा  आदी  उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी मेहनतीच्या आधारावर पुढे यावे. त्यांना त्यागाची भूमिका स्वीकारावी लागेल. मंत्रिमंडळ विस्तारात येऊ शकतील, असे अनेक ज्येष्ठ  आहेत; पण सर्वांचाच विचार करता येणार नाही, असे सांगत विस्तार काहीसा धक्कादायक असेल, असे संकेतही फडणवीस यांनी दिले.  एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा उल्लेख करताना त्यांनी हे सर्व अचानक घडले नव्हते. हे सर्व ठरवून घडले होते, असे सांगून टाकले. या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा होती. मोदींच्या आशीर्वादामुळे हे सर्व घडले. अमित शहा, जे. पी. नड्डा हे नेते भक्कमपणे पाठीशी उभे राहिले, असे फडणवीस म्हणाले.

शिवसेना- राष्ट्रवादीचे साटेलोटे निवडणुकीपूर्वीचशिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विधानसभा निवडणुकीपूर्वीच साटेलोटे होते. भाजपचे उमेदवार पाडले गेले. निवडणुकांचा निकाल येताक्षणी शिवसेना नेते आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत होते. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेत येण्यासाठी नंबर जुळवत होते. मी वारंवार फोन केले; पण मला  प्रतिसाद दिला गेला नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMLAआमदारBJPभाजपा