दिव्यांग वधू-वर : सानपाड्यामध्ये विशेष विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 06:54 IST2018-05-08T06:54:28+5:302018-05-08T06:54:28+5:30

वात्सल्य ट्रस्टने सांभाळ केलेली शीतल व वसई येथील अंबरीश होटकर या दिव्यांगांचा सोमवारी सानपाड्यामध्ये विवाह झाला. सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिल्यामुळे हा विशेष विवाह सोहळा पार पडला असून

 Divyaang Bridesmaid: Special wedding ceremony in Sanpada | दिव्यांग वधू-वर : सानपाड्यामध्ये विशेष विवाह सोहळा

दिव्यांग वधू-वर : सानपाड्यामध्ये विशेष विवाह सोहळा

नवी मुंबई : वात्सल्य ट्रस्टने सांभाळ केलेली शीतल व वसई येथील अंबरीश होटकर या दिव्यांगांचा सोमवारी सानपाड्यामध्ये विवाह झाला. सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिल्यामुळे हा विशेष विवाह सोहळा पार पडला असून वधू - वरांना आशीर्वाद देण्यासाठी शहरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.
वात्सल्य ट्रस्ट अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. अनाथ मुलांचा सांभाळ, वृद्धाश्रम व विविध प्रशिक्षण शिबिरांचे संस्थेच्यावतीने आयोजन केले जाते. गतिमंद असलेल्या शीतलचाही ट्रस्टच्यावतीने लहानपणापासून सांभाळ केला जात आहे. ट्रस्टमध्ये वाढलेल्या मुला - मुलींना चांगले स्थळ मिळावे यासाठी पदाधिकारी पाठपुरावा करत असतात. शीतलचा विवाह वसई येथील मूकबधिर असलेल्या अंबरीश या तरूणाशी निश्चित करण्यात आला. नवी मुंबई रिटेल केमिस्ट आणि होलसेलर्स असोसिएशन, दि कंझुमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनीही यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. ७ मे रोजी सानपाड्यामधील केमिस्ट भवनमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.
विशेष मुलांच्या या विवाहासाठी शहरातील विविध क्षेत्रामधील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. यामध्ये माजी मंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियननचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे गणेश परळीकर, गौरीशंकर ब्याळे, मनपाच्या उपआयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसेवक सोमनाथ वास्कर, दिलीप बोºहाडे, बाळासाहेब कांडपिळे, वात्सल्य ट्रस्टचे सानपाडा प्रकल्प सल्लागार लक्ष्मण नलावडे, विजय ताम्हाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title:  Divyaang Bridesmaid: Special wedding ceremony in Sanpada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.