दिनकर सोनावणे याला न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:34 IST2018-10-25T23:34:25+5:302018-10-25T23:34:27+5:30
आदिवासी योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या दिनकर सोनावणेला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली होती, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दिनकर सोनावणे याला न्यायालयीन कोठडी
पनवेल : आदिवासी योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या दिनकर सोनावणेला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली होती, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पनवेल वसतिगृहात २०१३-१४ मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी स्पीकिंग कोर्स व महिलांसाठी गारमेंट मेकिंगचे प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासपत्र व शिलाई मशीन साहित्य वाटप योजनेत शासनाचे लाखो रु पये संस्था चालकांनी हडप केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. आदिवासी महिलांना गारमेंट मेकिंगचे तर कोळवाडी येथील विद्यार्थ्यांना मोफत इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले नाही. या प्रकरणी सोनावणेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.