चांधईत पाण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2016 02:57 IST2016-06-01T02:57:13+5:302016-06-01T02:57:13+5:30
कर्जत तालुक्यातील अनेक गावे व वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना अनेक दानशूर व समाजसेवक तालुक्यातील अनेक भागांतील नागरिकांना कसे पाणी पोचेल

चांधईत पाण्यासाठी वणवण
नेरळ : कर्जत तालुक्यातील अनेक गावे व वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना अनेक दानशूर व समाजसेवक तालुक्यातील अनेक भागांतील नागरिकांना कसे पाणी पोचेल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहेत. मात्र चांधई गावच्या चारही बाजूने पाण्याचे स्रोत उपलब्ध असतानाही कोणतेही प्रशासन गावापर्यंत पाणी पोचवू शकले नसल्याने चांधईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
कर्जत तालुक्यातील चांधई गावासाठी काही वर्षांपूर्वी पाणी योजनेचे काम हाती घेण्यात होते. परंतु काम पूर्ण होण्याअगोदर ठेकेदाराला कामाच्या मोबदल्यात ८० टक्के रक्कम अगोदर अदा केल्याने आता या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी चांधई पाणी योजनेचे काम रखडले असून, पाण्याअभावी ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. तालुक्यातील विविध टंचाईग्रस्त गावांपर्यंत शासन पोचले असताना चांधईमध्ये पाण्याची आवश्यकता असताना कुठल्याच प्रकारची योजना राबविली जात नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो, परंतु चांधई गाव याला अपवाद ठरत आहे. चांधई गावच्या काही अंतरावर पूर्वेस पेजनदी व पश्चिमेस उल्हास नदी असूनही चांधई गावाची तहान भागवण्यास प्रशासन अपुरे पडत आहे. पाणी योजना अपूर्ण असतानाही या पाणी योजनेचे तीन हप्ते म्हणजे जवळजवळ ८० टक्के बिलाचे पैसे ठेकेदाराला देण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. या योजनेसाठी विहीर खोदण्यात आली असून सिमेंट टाकी बांधण्यात आली आहे. तसेच गावापर्यंत दोन वर्षांपूर्वी लोखंडी पाइपही पोचले. एवढे करूनही ही पाणी योजना अपूर्ण अवस्थेत आहे.
सुमारे सात वर्षांपूर्वी गावाची पाण्याची समस्या सोडविण्साठी तत्कालीन सरपंच प्रिया रसाळ यांनी भारत पेयजल योजना नसरापूर व चांधई गावासाठी मंजूर करून घेतली. त्यापैकी नसरापूर गावची पाणीयोजना तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली. परंतु चांधई गावची पाणी योजना अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. तसेच राजनाल्याचे पाणी चांधईपर्यंत पोचविण्यात येईल, असे आश्वासन वर्षभरपूर्वी देण्यात आले होते. परंतु या आश्वासनाची पूर्तता करण्यात प्रशासन चालढकल करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
मागील सहा महिन्यांपासून गावकरी नाल्याच्या पाण्यासाठी आग्रही असताना फक्त नाल्याचे काम पूर्ण झाले नाही, अशी सबब पुढे करीत पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे यावर्षी अपेक्षित असलेली धान्य व कडधान्य पिके प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी घेऊ शकला नाही. त्यामुळे शेतकरऱ्यांच्या या नुकसानीला फक्त प्रशासन जबाबदार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. राजनाल्याच्या पाण्याचा वापर शेतीसाठी व गृहोपयोगी कामांकरिता केला जातो. (वार्ताहर)१राजनाल्याच्या पाण्याचा वापर शेतीसाठी व गृहोपयोगी कामांकरिता केला जातो. काही काळापासून पाणीच गावात न पोचल्याने गावच्या तोंडचेच पाणी पळाले आहे. गावात असलेल्या विहिरी व हातपंप ओस पडले आहेत. गावातील महिला पाण्यासाठी हातपंपावर तासंतास उभ्या राहताना दिसून येत आहेत. २गावातील महिला पाण्यासाठी हातपंपावर तासंतास उभ्या राहताना दिसून येत आहेत. एक हंडाभर पाण्यासाठी ताटकळत बसावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ येथील महिलांवर आली आहे.३त्यामुळे या रखडलेल्या योजनेची चौकशी करून लवकरात लवकर ही पाणी योजना पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. ही योजा लवकर मार्गी लावून न्याय द्यावा अशीही मागणी
के ली जात आहे.