शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

टाकाऊपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन

By admin | Updated: March 14, 2017 02:13 IST

कर्जत तालुक्यातील हेदवली येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य बनवले आहे

नेरळ : कर्जत तालुक्यातील हेदवली येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य बनवले आहे. हे शैक्षणिक साहित्य शाळेच्या परिसरात लावण्यात आले आहे. या साहित्यामुळे शाळेला आगळेवेगळे रूप आले असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत नक्कीच वाढ होईल. शिक्षक बाळाराम गायकर व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. कर्जतपासून २५ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पायथ्याशी हेदवली गावात जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. सुमारे १४० विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून सहा शिक्षक कार्यरत आहेत. येथील शिक्षक बाळाराम गायकर यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता टाकाऊ वस्तूंपासून टिकावू शैक्षणिक साहित्य बनविले आहे. शिक्षकांच्या या उपक्रमाचे पालकांकडून समाधान व्यक्त होत आहे. गायकर यांनी तेलाचे रिकामे डबे, लाकूड, पत्रे, अशा अनेक टाकाऊ वस्तूंना रंग आकार देऊन सूत्रांचे मंत्र, गणिताची उदाहरणे देणारे फलक, वाढदिवस दर्शविणारे फलक, माणुसकीची भिंत, विजेपासून धोका, शांतता राखा, अपंगांना मदत करा असे सुविचार लिहिलेले अनेक फलक तयार केले आहेत.हेदवली शाळेतील शिक्षक हे नेहमीच विविध उपक्र म राबवत असून त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यास मदत होते. शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असूनही गेली अनेक वर्षे येथे तीनच वर्गखोल्या असल्याने सातवीपर्यंतचे वर्ग तीन वर्गखोल्यांमध्ये भरवले जात आहेत. वर्गखोल्या वाढविण्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा, पत्रव्यवहार करूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून आसन व्यवस्थेच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन हेदवली शाळेतील वर्गखोल्या वाढविण्यास पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ व पालकांनी केली आहे. (वार्ताहर)