शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

पादचारी महिलेकडे केली शरीरसंबंधाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 4:08 AM

एपीएमसीतला प्रकार : सार्वजनिक ठिकाणी अनैतिक धंद्यांचा परिणाम

सूर्यकांत वाघमारे।नवी मुंबई : विश्रांतीसाठी रस्त्यालगत थांबलेल्या महिलेकडे तिच्या पतीसमक्ष शरीरसंबंधाची मागणी केल्याचा प्रकार एपीएमसीत घडला. शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे वेश्यागमनासाठी आलेला ग्राहक व महिलेच्या पतीमध्ये जोरदार भांडण झाले. उघड्यावर चालणाऱ्या अनैतिक धंद्यांना आवर घालण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने अशा प्रकारांमधून सर्वसामान्य महिलांना बदनामीकारक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.शहरात जागोजागी उघड्यावर वेश्याव्यवसायाचे अड्डे चालवले जात आहेत. पोलिसांच्या कारवाईचा धाक न राहिल्याने यापूर्वी केवळ तुर्भेतील के.के.आर. रोड परिसरात चालणारा वेश्याव्यवसाय संपूर्ण शहरभर पसरला आहे. रेल्वेस्थानक परिसर, सार्वजनिक स्वच्छतागृहे, ट्रक टर्मिनल यासह शहरातील एकांताच्या जागी हे अनैतिक धंदे चालत आहेत. त्यापैकी एपीएमसी आवारातील मॅफ्को मार्केट समोरील चौकालगत चालणाºया अनैतिक धंद्यांवर पोलिसांनी यापूर्वीही अनेकदा कारवाई केली आहे. परिसरातील झोपडपट्टीत राहणाºया अथवा शहराबाहेरून आलेल्या महिला, मुली त्या ठिकाणी दिवस-रात्र वैश्या व्यवसायासाठी उभ्या असतात. तर ग्राहकासोबत बोलणी ठरल्यानंतर परिसरातच आडोशाच्या ठिकाणी अश्लिल कृत्य केले जाते. याचा त्रास त्या ठिकाणावरून जाणाºया सर्वसामान्य महिलांना सहन करावा लागत आहे. शनिवारी रात्री अशाच प्रकारातून गावी चाललेल्या एका महिलेला पतीसमोर बदनामी सहन करावी लागली. रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास हे दाम्पत्य गावी जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रतीक्षेत थांबले होते. सानपाडा पुलाखाली तसेच मॅफ्को चौकालगत रात्रीच्या वेळेस खासगी ट्रॅव्हल्स थांबतात. यामुळे हे दाम्पत्य त्या ठिकाणी बस येण्यास अवधी असल्याने रस्त्यालगत बसले होते. याच वेळी तिथे आलेल्या एका मद्यपी व्यक्तीने सदर महिलेकडे वेश्यागमनासाठी दर विचारला. पतीसोबत बसलेली असताना आलेली व्यक्ती आपल्यासोबत असे वक्तव्य करत असल्याने सदर महिला भयभीत झाली. अखेर संतप्त झालेल्या महिलेच्या पतीने त्या व्यक्तीसोबत वाद घातला असता त्यांच्यात हाणामारी होऊन बघ्यांची गर्दी जमली. अखेर प्रत्यक्षदर्शींनी या प्रकाराची माहिती १०० नंबरवर कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी जमावाने पोलिसांनाही धारेवर धरत, तिथे वेश्याव्यवसाय चालत असतानाही कारवाई का करत नाही, याचा जाब विचारला.शहरातील वाढते अवैध धंदे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहेत. वेश्याव्यवसाय, गांजाविक्री अशा अवैध धंद्यांमुळे रात्री-अपरात्री शहरातील तरुण पिढी वाममार्गाला जाऊ लागली आहे. यामुळे उद्ध्वस्त होत चाललेले शहराचे भवितव्य जपण्यासाठी पोलिसांनी कर्तव्याप्रति प्रामाणिकता दाखवावी. - संतोष जाधव, प्रत्यक्षदर्शीमॅफ्को मार्केटलगत उघडपणे वेश्याव्यवसाय चालत असतानाही पोलिसांना तो दिसत नाही, याचे आश्चर्य आहे. जोपर्यंत अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी कारवाई होत नाहीत, तोपर्यंत सर्वसामान्य महिलांनाही बदनामीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पोलिसांनी वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यांवर कारवाई करून सर्वसामान्य महिलांना सुरक्षेची खात्री पटवून द्यावी.- योगेश बर्गे, तुर्भे रहिवासीच्मागील दोन वर्षांत शहरात अनैतिक धंदे वाढले आहेत. अमली पदार्थ विक्री, वेश्याव्यवसाय, देशी दारू विक्री याचे अड्डे ठिकठिकाणी उघडपणे चालत आहेत. या धंद्यांमध्ये शहराबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा समावेश दिसून येत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा