पावणे येथे एकावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 23:05 IST2019-08-27T23:05:46+5:302019-08-27T23:05:52+5:30
पावणे येथे एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना घडली आहे.

पावणे येथे एकावर जीवघेणा हल्ला
नवी मुंबई - पावणे येथे एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना घडली आहे. सदर हल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेली व्यक्ती राजे प्रतिष्ठानची नवी मुंबई उपाध्यक्ष आहे. यामुळे प्रतिष्ठानशी संबंधित तरुणांनी मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे.
अजय साळुंखे असे जखमीचे नाव आहे. मंगळवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पावणे येथे ही घडताना घडली. साळुंखे हे त्या ठिकाणावरून जात असतात काही अज्ञात व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी साळुंखे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून पळ काढला. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत. तर या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.