पनवेल : नवी मुंबई वसवताना सिडकोच काम सुरू करण्याचं ठरलं. स्थानिक शेतकऱ्यांनी मोबल्यासाठी आंदोलन केले.तेव्हा जासईच्या जवळपास गोळीबार झाला काही लोक मृत्युमुखी पडले. राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी माझ्याकडे होती. मी जासईला गेलो सगळ्या लोकांशी सुसंवाद साधला आणि सुदैवानं फार थोड्या दिवसांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद माझ्याकडे आलं. तेव्हा पहिला निर्णय विशेषतः डी. बी. पाटील आणि दत्तूशेठ यांच्याशी सुसंवाद साधून आम्ही कोणता घेतला असेल तो म्हणजे जी काही नुकसान भरपाई असेल ती तर देऊच देऊ पण विकसित जमिनींपैकी साडेबारा टक्के जमीन हीसुद्धा देऊ. हा निर्णय आपण घेऊ शकलो पण त्यापाठीमागे दिबा पाटीलांसोबत दत्तूशेठ पाटील यांचे मोठे योगदान असल्याची आठवण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दि.8 रोजी नावडे येथे करून दिली. शेकापचे दिवंगत आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व स्मारकाचे अनावरण प जो म्हात्रे महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.नवी मुंबई शहर आज वसले आहे.याकरिता स्थानिकांनी जो साडेबारा टक्केचा ऐतिहासिक लढा दिला त्याची आठवण पवारांनी करून दिली.या कार्यक्रमाला शरद पवारांसह त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार,शेकाप नेते जयंत पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन ॲड. भगिरथ शिंदे,आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, संस्थेचे संघटक अनिल पाटील, माजी विधान परिषद सदस्य दत्तात्रय सावंत ,दत्तूशेठ यांचे पुत्र मा.बाळाराम पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने प जो म्हात्रे विद्यालयाचे माजी विद्यार्थी ,शिक्षक ,शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते. दत्तूशेठ पाटील यांनी एकेकाळी रयत शिक्षण संस्थे चा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं.त्यांनी जे रयतच काम केले ते काम आज बाळाराम पाटील पुढे घेऊन चाललेले आहेत आणि त्यामुळे याही जिल्ह्यांमध्ये रयतेचा विस्तार झालेला आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल होत असल्याचे पवारांनी सांगितले. त्यांचा पुतळा बघितल्यानंतर साक्षात दत्तूशेठ आपल्यापुढे उभे आहेत असं वाटतं आणि त्यांच्याबरोबर जी दोन बालके त्यांच्यासोबत आहेत, विद्यार्थी आहेत याचा अर्थ स्पष्ट होतो की ज्ञानदानाच्या संदर्भात जे त्यांनी काम केलं ते पुढे घेऊन जाण्यासाठी दत्तूशेठ आजही आपल्यामध्ये आहेत असे पवार पुढे म्हणाले.
साडेबारा टक्केच्या लढ्यात दत्तूशेठ यांचे योगदान मोठे - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 19:23 IST