शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

पनवेल फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 3:59 AM

रोटरी क्लब आॅफ पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फेस्टिव्हलचे शुक्रवारी सायंकाळी मराठमोळ्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा केलेल्या २५०पेक्षा जास्त कलाकरांनी सर्वांची मने जिंकून घेतली.

कळंबोली : रोटरी क्लब आॅफ पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फेस्टिव्हलचे शुक्रवारी सायंकाळी मराठमोळ्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा केलेल्या २५०पेक्षा जास्त कलाकरांनी सर्वांची मने जिंकून घेतली. त्याचबरोबर ढोल-ताशांच्या गजरावर कित्येकांनी ठेका धरला. खांदेश्वर रेल्वेस्थानक रोडवरील सर्कस मैदानावर दहा दिवस चालणाºया या फेस्टिवलचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे.सुरुवातीला वादळ ढोल-ताशा पथकातील वाद्य कलाकारांनी वेगवेगळे फ्युजन वाजवत खºया अर्थाने वादळ निर्माण केले. त्यानंतर लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा हे साहसी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांना जिंकून घेण्यात आले. सखी ग्रुप मंचने ‘जयो स्तुते श्री महामंगले’ या गीतावर टिपरी नृत्य सादर करीत वातावरण मंगलमय केले. नृत्याजंली ग्रुपने ‘शुभ स्वागतम आनंद मंगल मगलम’ या गाण्यावर नृत्याविष्कार सादर करीत सर्वांचे स्वागत केले. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळविली. पंजाबी ग्रुपमधील स्थानिक कालाकारांनी ‘मुंदडा जजदा वो सोनिया’ गीतावर भांगडा नृत्य केले, त्याला उत्स्फूर्त दाद मिळाली. वारकरी ग्रुपने दिंडी नृत्य करीत सर्वांना दिंडी दर्शन घडविले. भैरी भवानी ग्रुप, किंग्स पनवेलकर, मराठा विरअर्स यांनी नृत्य केले. तर शिवसह्याद्री ढोल-ताशा पथकानेही वेगवेगळ्या फ्युजनचे सादरीकरण केले. या फेस्टिव्हलचे उद्घाटन अभिनेत्री अमृता खानविलकर, रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल विनय आणि रेश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, सभागृहनेते परेश ठाकूर, रोटरी क्लबचे चेअरमन संतोष अंबावने, सचिव निखील मनोहर, रोटरीयन डॉ. दीपक पुरोहित, मिलिंद पर्वते, सूर्यकांत कुल्हे यांच्यासह रोटरीयन्स, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने काढलेली मिरवणूक आणि उद्घाटन कार्यक्र माचे अमृता खानविलकर यांनी कौतुक केले. या फेस्टिव्हल भेट दिल्यानंतर मी दहा वर्षांपूर्वी जात असलेल्या फेस्टिव्हलची आठवण आल्याचे त्यांनी सांगितले. या फेस्टिव्हलची व्याप्ती वाढवून स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन खानविलकर यांनी केले. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी, या फेस्टिव्हलमुळे पनवेलचे नावलौकिक वाढत चालले आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून जे उपक्रम राबविले जातात, हे कौतुकास्पद असल्याचे म्हणाल्या.महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी घनकचरा व्यवस्थापनाची माहिती उपस्थितांना दिली. त्याचबरोबर स्वच्छता अभियानात रोटरी क्लब सारख्या सामाजिक पार्टनरची गरज असल्याचे मत व्यक्त केले. अशा फेस्टिव्हल माध्यमातून पुण्यात होत नाही ते पनवेलला पाहावयास मिळत असल्याचे विनय कुलकर्णी म्हणाले. रेश्मी कुलकर्णी आणि संतोष अंबावने यांनी मनोगत व्यक्त केले. साडेसहा एक्कर जागेवर दोनशेपेक्षा जास्त स्टॉल लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू आणि इतर अनेक गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.साहसी खेळांचे प्रदर्शनदांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी या साहसी खेळांचे दर्शन उद्घाटनाच्या वेळी दाखविण्यात आले. हा थरार पहिल्या दिवसाचे खास आकर्षण होते. या माध्यमातून पांरपरिक आणि मराठमोळ्या खेळांची माहिती पनवेलकरांना करून देण्यात आली.