शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

धरणा कॅम्प शाळा पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 27, 2015 02:42 IST

कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्यरीत्या पुनर्वसन सरकारने केलेच नाही. पनवेल तालुक्यातील धरणा कॅम्प येथील

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीकोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्यरीत्या पुनर्वसन सरकारने केलेच नाही. पनवेल तालुक्यातील धरणा कॅम्प येथील शाळेचीही दुरवस्था झाली असून जिल्हा परिषदेकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने ८५ विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीत शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. १९६१ साली सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील करंजावडे गावातून कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे स्थानिक मंडळी बाधित झाली. सरकारने त्यातील काही कुटुंबांचे पुनर्वसन पनवेल तालुक्यातील रोहिंजन गावालगत केले. भवानीनगर म्हणून ओळखला जाणारा हा धरणाकॅम्प सध्या अनेक समस्यांनी त्रस्त आहे. या ठिकाणी तीन वर्गखोल्यांमध्ये शाळा भरविली जात असली तरी तिन्हींची दुर्दशा झाली आहे. एक वर्ग तर पूर्णत: मोडकळीस आला असल्याने या ठिकाणी मुलांना बसविण्यात येत नाही. दुसऱ्या दोन खोल्यात शाळा भरविली जात असून त्या छताला गळती लागली आहे. पावसाळा सुरू असल्याने वर्गावर ताडपत्री टाकून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेच्या भिंतीला तडे गेले आहेत, वर्गखोल्यांच्या लाद्याही उखडल्या आहेत. अनेकदा विद्यार्थी त्यात अडकून पडतात. येथील शौचालयाची स्थिती अतिशय वाईट असून त्याला दरवाजे नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या संदर्भात अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाचे सहसचिव आर.टी.कदम यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. शिवाय वारंवार पाठपुरावाही केला आहे, तरी सुध्दा त्वरित उपाययोजना केल्या जात नाही. तीनही वर्गखोल्या जमीनदोस्त करून नवीन इमारत बांधण्याची आमची मागणी असल्याचे ग्रामस्थ संदीप पवार यांनी सांगितले.