शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

डाळी-कडधान्याचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:58 IST

देशभर डाळींसह कडधान्याचे बाजारभाव गडगडले असून गेल्यावर्षी घाऊक बाजारपेठेत १०० ते १२५ रुपये किलो दराने विकल्या जाणा-या डाळींचे दर यंदा ६० ते ७० रुपयांवर आले

- नामदेव मोरे नवी मुंबई : देशभर डाळींसह कडधान्याचे बाजारभाव गडगडले असून गेल्यावर्षी घाऊक बाजारपेठेत १०० ते १२५ रुपये किलो दराने विकल्या जाणाºया डाळींचे दर यंदा ६० ते ७० रुपयांवर आले आहेत. देशभर पाच वर्षांपासून डाळी व कडधान्यांना चांगले बाजारभाव मिळू लागले होते. टंचाई दूर करण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात केली जात होती. वाढलेले बाजारभाव लक्षात घेऊन महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमधील शेतकºयांनी कडधान्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले. परंतु शासनाने आयात व निर्यातीविषयी योग्य निर्णय घेतले नसल्याने सध्या डाळींसह कडधान्याचे भाव गडगडले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये गतवर्षी चणाडाळ ११० ते १२५ रुपये किलो दराने विकली जात होती. तूर डाळ ८० ते ११५ व मूग डाळ ७० ते १०० रुपये किलो दराने विकली जात होती. परंतु तीन महिन्यांपासून या दरामध्ये सातत्याने घसरण होऊ लागली आहे. सध्या हे दर किमान ५० ते कमाल ८५ रुपयांवर आले आहेत. किरकोळ बाजारात हेच दर ७० ते ८५ रुपये किलो इतके आहेत.डाळी व कडधान्यांचे दर एक वर्षात जवळपास निम्म्याने कमी झाले आहेत. सरकारने हस्तक्षेप करून डाळींची आयात थांबवून निर्यातीला प्रोत्साहन दिले तरच परिस्थिती बदलेल, असे ग्रेन, राईस अँड आॅईल सीड्स मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शरद मारू यांनी सांगितले.घाऊक बाजारातील डाळींचे दर पुढीलप्रमाणेवस्तू आॅक्टोबर २०१६ जुलै २०१७चणाडाळ ११० ते १२५ ६० ते ७०तूरडाळ ८० ते ११५ ४५ ते ५५मूगडाळ ७० ते १०० ५० ते ५५मसूरडाळ ६० ते ७० ४० ते ४५सध्या किरकोळ बाजारातील दरतूरडाळ-८० ते ८५ रुपये, मसूरडाळ-७० ते ७५ रुपये, मूगडाळ-७५ ते ८५ रुपये, चणाडाळ- ८५ ते ९५ रुपये.