शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वायू वाहिनीसाठी सीआरझेडची परवानगी बंधनकारक

By नारायण जाधव | Updated: November 21, 2022 19:35 IST

२५ लाखांची बँक गॅरंटीही भरा- गेल इंडियाला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: CRZ अर्थात सागर किनारा नियंत्रण प्राधिकरणाच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय 'गेल इंडिया'ने जेएनपीटी ते अलिबाग तालुक्यातील उसरपर्यंतची आपली वायू वाहिनी टाकू नये, अशी अट महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातली आहे. शिवाय २५ लाख रुपयांची बँक गॅरंटी देण्यासही मंडळाने आपल्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या संमती समितीच्या बैठकीत गेल इंडियास सांगितले आहे.

परदेशातून बंदरमार्गे जहाजातून येणाऱ्या आयात वायू वाहून नेण्यासाठी जेएनपीटी ते अलिबाग तालुक्यातील उसर अशी उरण, पेण व अलिबाग व पनवेल या चार तालुक्यांतून ही वायू वाहिनी जाणार आहे. यासाठी खोपटेतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला आहे. उरण येथे नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान ही वायू वाहिनी शेतजमिनीऐवजी रस्त्यालगतच्या जमिनीतून न्यावी, अशीही सूचना शेतकऱ्यांनी केली आहे.

४५ किमी लांब असणार वायू वाहिनी

शेतकऱ्यांची ३० मीटर रुंदीची जमीन यासाठी संपादित करण्यात येणार आहे. सुमारे ४५.४५३ किमी लांबीची ती असणार आहे. १२ डायमीटरची ती असणार आहे. ती एकदा कार्यान्वित झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेती करताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

गेल समोरील अडचणीत वाढ

वायू वाहिनी ज्या मार्गातून जाणार आहे, त्यातील बहुतेक भाग सीआरझेड क्षेत्रात मोडणारा आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत आला होता. तेव्हा नेमक्या याच मुद्द्यावर मंडळाने बोट ठेवून तो मंजूर करताना मंडळाने गेल इंडियास सीआरझेडची परवानगी आणि २५ लाख रुपयांची बँक गॅरंटी बंधनकारक केली आहे. शेतकऱ्यांचा आधीच जमिनी देण्यास विरोध असताना आता सीआरझेडचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केल्याने गेल इंडिया समोरील अडचणी वाढल्या आहेत.

भूसंपादनानंतर रोजगार नाही

केंद्र सरकारच्या पाइपलाइन कायद्याचा वापर केला जाणार असून, शेतकऱ्यांना बाजारभावाच्या अवघ्या १० टक्के रक्कम मोबदला म्हणून दिली जाणार आहे. त्याचवेळी या जमिनीचा शेतीसाठी वापर करता येणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, भूसंपादनाच्या बदल्यात या कायद्यात पुनर्वसन म्हणून रोजगार दिला जाणार नसल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई