शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनिमित्त बाजारात गर्दी;  १५० टन फुलांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 23:45 IST

एक आठवड्यात ६५० टन सुका मेव्याची आवक

नामदेव मोरे नवी मुंबई : दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पनवेलसह नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी शेतकरी स्वत: फूलविक्रीसाठी आले आहेत. दोन दिवसांमध्ये तब्बल १५० टन फुलांची या परिसरात विक्री होणार आहे. एक आठवड्यामध्ये मुंबई बाजार समितीमध्ये तब्बल ६५० टन सुका मेव्याचीही विक्री झाली असून, ६० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामधील सर्व बाजारपेठेमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

दिवाळीनिमित्त झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. पुणे व नाशिक जिल्ह्यामधील १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी स्वत:च या परिसरामधील विविध ठिकाणी फुलांची विक्री सुरू केली आहे. मुंबईमधील मार्केटमध्ये फुले विक्रीसाठी पाठविली, तर त्याला चांगला बाजारभाव मिळत नाही. अनेक वेळा आवक जास्त झाल्यामुळे बाजारभाव पडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असते. दहा वर्षांपूर्वी मुंबईत फुले विक्रीसाठी गेलेल्या शेतकºयांना चांगला भाव मिळाला नाही, यामुळे काहींनी नवी मुंबईमधील पदपथावर फुलांची विक्री केली व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून पुणे जिल्ह्यातील घोडेगाव व नाशिकमधील शेतकरी स्वत:च फुलांची विक्री करू लागले आहेत.

सद्यस्थितीमध्ये वाशी, सानपाडा, नेरुळ, पनवेल व इतर ठिकाणी १०० पेक्षा जास्त शेतकरी स्वत:च विक्रेते बनले आहेत. यावर्षी तब्बल १५० टन फुलांची आवक या परिसरामध्ये झाली आहे. ७० ते ८० रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे. शेतकºयांना चांगला भाव मिळत असून, ग्राहकांनाही स्वस्त दरामध्ये फुले मिळत असल्यामुळे शेतकरी बाजारपेठेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.दिवाळीमध्ये मिठाईची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते; परंतु मागील काही दिवसांमध्ये मिठाईसाठी वापरण्यात येणारा मावा व इतर वस्तूंमध्ये भेसळ झाल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. याशिवाय गोड मिठाई शरीराला घातक असल्यामुळे ग्राहकांकडून सुका मेव्याला अधिक पसंती मिळू लागली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील सहा दिवसांमध्ये रोज सरासरी १०० टन सुका मेव्याची विक्री झाली आहे. तब्बल ६५० टन काजू, बदाम, पिस्ता व आक्रोडची विक्री झाली असून, या माध्यमातून एपीएमसीमध्ये ६० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.बाजार समितीमध्ये बाहेर थेटही मोठ्या प्रमाणात सुका मेव्याची विक्री झाली आहे. एपीएमसी व बाहेरील थेट विक्रीच्या या व्यवसायामधील उलाढाल १०० कोटीपेक्षा जास्त झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. पुढील दोन दिवसांमध्येही सुका मेव्याची उलाढाल मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.शेतकºयांमध्ये समाधाननवी मुंबईमधील वाशी व इतर ठिकाणी पुणे जिल्ह्यामधील मोठ्या प्रमाणात शेतकरी फूलविक्री करण्यासाठी आले आहेत. जवळपास दहा वर्षांपासून अनेक शेतकरी नवी मुंबईमध्ये येत असून पदपथावर व्यवसाय करत आहेत. शेतकºयांना महापालिका प्रशासन व नवी मुंबईकरांकडूनही चांगले सहकार्य होत आहे. फुलांच्या थेट विक्रीतून चांगला मोबदला मिळत असल्यामुळे शेतकºयांनीही समाधान व्यक्त केले आहे.आरोग्यविषयी जागरूकताया पूर्वी दिवाळीमध्ये भेट म्हणून मिठाई मोठ्या प्रमाणात दिली जात होती; परंतु मिठाई आरोग्यास घातक असते. २४ तासांमध्ये मिठाई संपविणे आवश्यक असते. मिठाई वेळेत संपली नाही तर ती खराब होण्याची शक्यताही असते. नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढली असल्यामुळे सुका मेव्याला पसंती वाढली असून मिठाईपेक्षा त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी