नेरूळ-उरण लोकलमधील गर्दी कमी होणार; फेऱ्या दीड पटीने वाढणार, वेळापत्रक बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 05:32 IST2025-09-23T05:32:19+5:302025-09-23T05:32:19+5:30

वाढीव सेवेमुळे दोन लोकल गाड्यांमधील अंतर कमी होईल. गरज पडल्यास भविष्यात गाड्यांच्या फेऱ्या दुप्पटीने वाढवण्यात येतील असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.  

Crowding in Nerul-Uran local will decrease; number of trips will increase by one and a half times, schedule will change | नेरूळ-उरण लोकलमधील गर्दी कमी होणार; फेऱ्या दीड पटीने वाढणार, वेळापत्रक बदलणार

नेरूळ-उरण लोकलमधील गर्दी कमी होणार; फेऱ्या दीड पटीने वाढणार, वेळापत्रक बदलणार

मुंबई : मुंबई लोकलच्या नेरळ-उरण मार्गावरील लोकलमधील गर्दी कमी होणार आहे. या मार्गावर लवकरच सुमारे १.५ पट फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. दिवसेंदिवस प्रवाशांची वाढती लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये रेल्वेचे वार्षिक वेळापत्रक बदलत असून, त्यामध्ये हा बदल नियोजित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सध्या, नेरूळ ते उरण दरम्यान लोकल गर्दीच्या वेळी अंदाजे एक तास आणि गर्दी नसलेल्या वेळी अंदाजे दीड तासाच्या अंतराने धावतात. दरम्यान, बेलापूर ते उरण सेवादेखील यानुसारच धावते. उरण मार्गावर सध्या दिवसभरात गाड्यांच्या ४० फेऱ्या धावतात. नवीन वेळापत्रकानुसार त्या फेऱ्या ६० पर्यंत वाढवण्याची योजना रेल्वेने आखली आहे. त्यानुसार अप मार्गावर ३० आणि डाउन मार्गावर ३० सेवा चालवल्या जातील. वाढीव सेवेमुळे दोन लोकल गाड्यांमधील अंतर कमी होईल. गरज पडल्यास भविष्यात गाड्यांच्या फेऱ्या दुप्पटीने वाढवण्यात येतील असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.  

तारघर स्थानक खुले होणार
तारघर रेल्वेस्थानक नवी मुंबई विमानतळाच्या अगदी जवळ आहे आणि हे स्थानक लवकरच  खुले होईल. तारघर स्टेशन बेलापूर आणि बामणडोंगरी दरम्यान तर  गव्हाण स्टेशन खारकोपर व शेमाटीखार दरम्यान बांधले आहे. परिणामी प्रवाशांची गर्दी वाढणार असल्याने गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात येतील. दरम्यान, अतिरिक्त १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याची योजनाही आहे.

Web Title: Crowding in Nerul-Uran local will decrease; number of trips will increase by one and a half times, schedule will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.