साजगाव यात्रेत कोटय़वधींची उलाढाल

By Admin | Updated: November 11, 2014 22:59 IST2014-11-11T22:59:30+5:302014-11-11T22:59:30+5:30

महाराष्ट्रात धाकटी पंढरी म्हणून परिचित असलेल्या बोंबल्या विठोबा यात्रेला रविवारपासून गर्दी वाढू लागली आहे. ही यात्र प्रबोधिनी एकादशीस प्रारंभ झाली असली तरी खरी गर्दी रविवारपासून वाढू लागली आहे.

Croats turnover in Sajgaon yatra | साजगाव यात्रेत कोटय़वधींची उलाढाल

साजगाव यात्रेत कोटय़वधींची उलाढाल

वावोशी : महाराष्ट्रात धाकटी पंढरी म्हणून परिचित असलेल्या बोंबल्या विठोबा यात्रेला रविवारपासून गर्दी वाढू लागली आहे. ही यात्र प्रबोधिनी एकादशीस प्रारंभ झाली असली तरी खरी गर्दी रविवारपासून वाढू लागली आहे. 
रायगड जिल्हय़ात साजगाव यात्र व बोंबल्या विठोबा यात्र या नावाने परिचित असणारी यात्र सलग 15 दिवस चालते. 15 दिवसांत करोडो रुपयांची उलाढाल या यात्रेत होत असल्याने मुंबई, पुण्याकडील व्यापारी या यात्रेत आपली दुकाने थाटतात.
खेळणी, मिठाई, कपडे, घोंगडय़ा विक्रीची दुकाने या यात्रेत असतात. सर्वात मोठा बाजार सुक्या मासळीचा असतो. सुमारे 1क्क् दुकाने या यात्रेत असतात. o्रीवर्धन, पेण, अलिबाग या ठिकाणचे कोळी बांधव यासाठी महिनाभर याची तयारी करतात. सर्वात जास्त विक्री होते ती सुक्या बोंबलाची. म्हणूनही या यात्रेला बोंबल्या विठोबा यात्र संबोधित करतात.
घाटमाथ्यावरून संतo्रेष्ठ तुकाराम महाराज मिरचीचा व्यापार करण्यासाठी या परिसरात आले होते. ग्रामस्थांनी मिरच्या विकत घेतल्या पण त्यांचे पैसे तुकाराम महाराजांना दिले नाही. तेव्हा महाराजांनी विठ्ठलाच्या नावे बोंबा मारल्या. o्री विठ्ठलाने महाराजांच्या नोकराच्या वेशात येवून त्यांचे विक्री झालेले पैसे जमा करून दिले. तेव्हापासून या विठ्ठलास बोंबल्या विठ्ठल असे संबोधित करतात, अशी आख्यायिका सांगितली जाते.
ग्रामीण भागातील ग्रामस्थांना ही यात्र पर्वणी असते. पूर्वी वाहने नव्हती. तेव्हा शेतकरी आपल्या कुटुंबासह बैलजोडीने या यात्रेत येत असत व चक्क दोन तीन दिवस यात्रेचा आनंद घेत असे. त्यावेळेस करमणुकीसाठी ख्यातनाम तमाशाचे फड असायचे. त्यामुळे तमाशा पथकांना ही विविध वगनाटय़ सादर करून चढाओढीने स्पर्धा व्हायची. पण कालांतराने तमाशाची जागा डान्स पार्टीने घेतली व तमाशाचे फड येईनासे झाले. 
यात्रेत मनोरंजनासाठी अनेक दालने असतात. त्यात मौत का कुआ, आकाश पाळणो व इतर विविध प्रकारची दालने सज्ज आहेत. तमाशाची जागा डान्स पार्टीने घेतल्याने तरुणांची गर्दी त्या ठिकाणी दिसून येते. यात्रेचे आयोजन खोपोली नगरपालिका आरोग्य विभाग व मंदिर देवस्थान कमिटी करत असते. त्यामुळे येथील जागेचे नाममात्र भाडे नगरपालिका घेत असते. त्याऐवजी पाणी, वीज याची व्यवस्था करते. परिसरातल्या गावातील वारक:यांच्या दिंडय़ा या कालावधीत मंदिरात येत असतात. टेकडीवरील सुंदर मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन डोळय़ात साठवून भाविक आपल्या घराकडे परततात. 
रायगड जिल्हय़ात सलग 15 दिवस चालणारी साजगाव यात्र ही एकमेव यात्र आहे. याठिकाणी कुस्त्यांचे फडही रंगतात. त्यासाठी मुंबई, पुणो, सांगली, सातारा येथील मल्ल या यात्रेत येत असतात. 
(वार्ताहर)
 
1मिठाई दुकानाच्या रांगेतही अनेक दुकानांत विविध प्रकारच्या रंगीत व आकर्षक मिठाई उपलब्ध असतात. या यात्रेत जिलेबीचा आस्वाद घेतल्याशिवाय यात्रेकरूं ची यात्र सफल होत नाही. कुटुंबासहित गरमागरम जिलेबी खाताना वेगळाच आनंद अनुभवास मिळतो.
2सुकी मासळी खरेदीसाठी मुंबई, पुण्याकडील भाविक या यात्रेला भेट देतात. यात्रेत कुस्त्यांचे फड रंगतात. त्यासाठी मुंबई, पुणो, सांगली, सातारा येथील मल्ल या यात्रेत येत असतात. पूर्वीपासून गुरांचा बाजारही या यात्रेत भरतो. पण अलिकडे शेती नसल्यामुळे गुरेही पाळत नसल्याने गुरांच्या बाजारात संख्या रोडावली आहे.
 
3मोठय़ा प्रमाणात यात्रेत हॉटेल व खाद्यपदार्थाची दुकाने असल्याने त्यासाठी लागणारा माल यात्रेतील व्यापारी परिसरातील स्थानिक व्यापा:यांकडून घेतात.मनोरंजनासाठी अनेक दालने असतात. त्यात मौत का कुआ, आकाश पाळणो व इतर विविध प्रकारची दालने सज्ज आहेत. 

 

Web Title: Croats turnover in Sajgaon yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.