Crime: जुन्या प्रेमासाठी नव्या प्रेमाचा घोटला गळा, धाराशिवच्या गुन्ह्याचा पनवेलमध्ये उलगडा
By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 15, 2024 20:29 IST2024-03-15T20:27:44+5:302024-03-15T20:29:09+5:30
Crime News: दोन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला असताना लहान पणाची प्रियसी पुन्हा जवळ आल्याने तिच्यासाठी पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धाराशिव मधील भूम येथे हि घटना घडली असून याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

Crime: जुन्या प्रेमासाठी नव्या प्रेमाचा घोटला गळा, धाराशिवच्या गुन्ह्याचा पनवेलमध्ये उलगडा
नवी मुंबई - दोन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला असताना लहान पणाची प्रियसी पुन्हा जवळ आल्याने तिच्यासाठी पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धाराशिव मधील भूम येथे हि घटना घडली असून याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृत्यदेह जाळून तो प्रियसीचा मृतदेह असल्याचे भासवले होते.
पनवेल डेपो परिसरात एक धाराशिव येथील गुन्ह्यातील आरोप येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे यांना मिळाली होती. त्यावरून उपायुक्त विवेक पानसरे, सहायक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी निरीक्षक प्रवीण भगत, उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, हवालदार परेश म्हात्रे, प्रसाद घरत, साईनाथ मोकल यांचे पथक केले होते. त्यांनी बुधवारी पनवेल डेपो परिसरात सापळा रचून सूरज लहू तोरडकर (२०) याला ताब्यात घेतले होते. यावेळी त्याच्यासोबत त्याची अल्पवयीन प्रियसी देखील होती. दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने भूम येथील गावी पत्नी पौर्णिमा पासलकर (१८) हिची हत्या करून मृतदेह जाळला असल्याचे सांगितले. तसेच ज्या अल्पवयीन मुलीला पळवून आणले आहे तिचा तो मृतदेह असल्याचे भासवण्यासाठी मृतदेहाजवळ तिच्या नावाने आत्महत्या केल्याची चिट्टी टाकली होती. त्यानंतर अल्पवयीन प्रियसीला घेऊन तो पनवेलच्या चिपळे गावात रहायला आला होता.
सूरज याचा दोन महिन्यांपूर्वीच पौणिमा सोबत प्रेमविवाह केला होता. मात्र तिच्यासोबत राहत असतानाच अगोदरची अल्पवयीन प्रियसी पुन्हा संपर्कात आली. यामुळे तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याने पौर्णिमाला मार्गातून हटवण्यासाठी हत्येचा कट रचला. तर अल्पवयीन मुलीला पळवल्यानंतर तिच्या घरचे मागे लागू नयेत म्हणून पतीचा मृतदेह हा पळवलेल्या मुलीचा भासवला होता. याप्रकरणी सूरज याला अटक करून धाराशिव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जोडव्यामुळे आला संशय
जळालेला मृतदेह अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांच्या ताब्यात देत असताना पायाच्या बोटात जोडवी दिसून आले. यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पौर्णिमाच्या कुटुंबियांना देखील पाहणीसाठी बोलवले. यावेळी पौर्णिमाच्या पायाच्या अंगठ्याजवळ असलेल्या जन्मखुणामुळे तिची ओळख पटली.