शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

coronavirus: लॉकडाऊनच्या बंदोबस्ताचा ताप, पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 12:18 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लावलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच, महिन्याभरात पालिकेकडून दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

नवी मुंबई : पालिकेकडून घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पोलिसांना भर पावसात बंदोबस्त करावा लागत असल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. शहरात लॉकडाऊन लावताना त्यामधून एमआयडीसी व एपीएमसी मार्केट वगळण्यात आल्याने त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांची वर्दळ सुरूच आहे. तर इतरही व्यावसायिकांवर पालिकेचा अंकुश नसल्याने नागरिक घराबाहेर निघत असल्याने, त्यांना आवर घालताना पोलिसांची दमछाक होऊ लागली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लावलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच, महिन्याभरात पालिकेकडून दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांना पुन्हा बंदोबस्तावर उभे राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, या लॉकडाऊनमधून एपीएमसी मार्केट व एमआयडीसी वगळण्यात आली आहे. यामुळे त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांची वर्दळ सुरूच आहे. दरम्यान, शहरात लॉकडाऊन यशस्वी कारण्यासाठीच नवी मुंबईत २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी वाहनांची झाडाझडती घेऊन कारवाया केल्या जात आहेत. मात्र, एमआयडीसी व एपीएमसी सुरूच असल्याने, त्या ठिकाणी ये-जा करणाºयांमुळे बंदोबस्तावरील पोलिसांवर ताण वाढतच आहे. परिणामी, पोलिसांकडून सरसकट कारवाया केल्या जात आहेत. यामध्ये अनेकांची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत, तर काहींवर गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत. मात्र, पालिकेच्या आदेशाला न जुमानता, अनेक विभागांमध्ये अर्धे शटर उघडे ठेवून व्यवसाय चालविले जात आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचे नियोजन फासल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवले जाण्याची गरज होती, असेही तज्ज्ञांचे मत आहे, परंतु तसे न करता एपीएमसी व एमआयडीसी सुरूच ठेवल्याने नागरिकांना घराबाहेर निघण्याची संधी मिळत असल्याने लॉकडाऊन अपयशी ठरत असल्याचीही टीका होत आहे. या फसलेल्या लॉकडाऊनचा ताप मात्र पोलिसांना सहन करावा लागत आहे.पावसात उभे राहून बजावत आहेत कर्तव्यएकीकडे पालिकेने नागरिकांना घराबाहेर निघण्यास दिलेली छुपी सूट व पोलिसांना सरसकट कारवाईचे वरिष्ठांकडून मिळालेले आदेश, यामध्ये नागरिक भरडले जात आहेत. पावसात उभे राहून रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने अडवून त्यांच्याकडे चौकशी करावी लागत आहे.अनोळखी व्यक्तींशी संपर्क येत असल्याने त्यांनाही कोरोनाची भीती सतावत आहे. कोरोनापासून बचाव झाला, तरी साथीच्या आजाराचे अथवा सततच्या बंदोबस्तामुळे इतर दुखणी वाढण्याची भीती आहे. कामानिमित्ताने ये-जा करणाºयांची संख्या आटोक्यात येत नसल्यानेही पोलिसांची दमछाक झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस