शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

CoronaVirus News in Navi Mumbai: पनवेलमध्ये अडकले तब्बल १ लाख ७५ हजार स्थलांतरित मजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 01:01 IST

केंद्र सरकराने या मजुरांना परप्रांतात पाठविण्यास हिरवा कंदील दाखविल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने संबंधित मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहे.

वैभव गायकरपनवेल : पनवेल तालुका तसेच महापालिका परिसरात सुमारे एक लाख ७५ स्थलांतरित मजूर लॉकडाउनमुळे अडकल्याची आकडेवारी समोर आली आहे. केंद्र सरकराने या मजुरांना परप्रांतात पाठविण्यास हिरवा कंदील दाखविल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने संबंधित मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहे.पनवेल परिसर सध्याच्या घडीला हजारो बांधकामे सुरू आहेत. विशेषत: एमआयडीसी, स्टील मार्केट आदीसह विविध विकासकामे यांमुळे रोजगाराच्या शोधात आलेला मजूरवर्ग पनवेल, नवी मुंबई परिसरात स्थायिक झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउनची घोषणा झाल्याने बेरोजगार झालेले मजूर, कामगारांवर उपासमारीची वेळ आली. काही नागरिक पायीच परराज्यात जाण्यासाठी निघाले. अनेकांनी पायीच हजारो मैलाचे अंतर गाठून आपले गाव गाठले. मात्र, लॉकडाउनचे नियम आणखी कडक झाल्यावर अनेक कामगार अडकले. अशा कामगारांना गावी जाण्याची व्यवस्था करण्याची मागणी होऊ लागली. अखेर या कामगारांना व मजुरांना गावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.पनवेल परिसरात एक लाख ७५ हजार स्थलांतरित मजूर अडकल्याची माहिती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने संबंधित मजुरांना त्या-त्या राज्यात पाठविण्यात येणार असल्याचे नवले यांनी सांगितले. याकरिता प्रक्रिया तयार करण्याचे काम सुरू आहे. जे परप्रांतीय मजूर कामगार आपल्या मूळ गावी जाऊ इच्छितात, अशांना आपली माहिती देण्यासाठी एक फॉर्म पालिका तसेच महसूल विभागाच्या माध्यमातून वितरित करण्यात आला आहे. हा फॉर्म भरून प्रभाग अधिकारी अथवा तलाठ्यांकडे देण्याच्या सूचना कामगारांना करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून याकरिता अ‍ॅपदेखील विकसित करण्यात आले आहे. यात कामगारांची माहिती भरली जाणार आहे. विशेष परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना राज्यात परत आणणार आहेत. अ‍ॅपवर कामगारांनी आपली माहिती भरल्यानंतर संबंधित परराज्यातील प्रशासनाशी जिल्हाधिकारी कार्यालय समन्वय साधणार आहे.>कोरोनाबाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत, अशा ठिकाणाहून कामगार तसेच मजूरवर्गाला स्थलांतरित करता येणार नाही. प्राथमिक सर्व्हेत पनवेल परिसरात एक लाख ७५ हजार स्थलांतरित कामगार व मजूरवर्ग आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांना मूळ गावी पाठविण्यात येणार आहे.- दत्तात्रेय नवले,प्रांत अधिकारी, पनवेल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस