शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

CoronaVirus News : एपीएमसीला पडला कोरोनाचा विसर, मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 23:25 IST

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गर्दीही काही प्रमाणात कारणीभूत आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला पुन्हा कोरोनाचा विसर पडला आहे. सर्वच मार्केटमध्ये मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या उपाययोजनांवर केलेला खर्चही व्यर्थ जात आहे.नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गर्दीही काही प्रमाणात कारणीभूत आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे व गर्दी नियंत्रणात न आणल्यामुळे व्यापारी, माथाडी कामगार व बाजार समिती कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे ते वास्तव्य करीत असलेल्या परिसरामध्येही प्रादुर्भाव वाढला होता. बाजार समितीविषयी शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या. मार्केटमध्ये येणाºया वाहनांवर व खरेदीसाठी येणाऱ्यांच्या संख्येवरही निर्बंध लावले. मार्केटमध्ये विशेष स्वच्छता मोहीम, निर्जंतुकीकरण, प्रवेशद्वारावर आॅक्सिजन व तापमान तपासणी सुरू केली. परंतु मागील काही दिवसांपासून नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करण्यास सुरुवात झाली आहे. पाचही मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. कामगार, व्यापारी, खरेदीदार मास्कचा वापर करीत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भाजी व फळ मार्केटमधील परिस्थिती सर्वांत जास्त भयावह आहे. दोन्ही मार्केटमध्ये परराज्यातील व रोजंदारीवरील काम करणाºयांची संख्या पुन्हा वाढली आहे. यामधील बहुतांश कामगार मार्केटमध्येच वास्तव्य करीत आहेत. हे कामगार सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. व्यापारीही त्यांच्या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष करीत आहेत.बाजार समितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. परंतु निष्काळजीपणामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. बाजार समितीच्या अनेक अधिकारी व कर्मचाºयांनाही लागण झाली आहे. अनेकांच्या परिवारातील सदस्यांनाही लागण झाली आहे. व्यापारी, कामगार बाजार समिती कर्मचाºयांचाही मृत्यू होऊ लागला आहे. यानंतरही सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवेशद्वारावरील आॅक्सिजन व तापमान तपासणी केंद्र फक्त नावापुरते शिल्लक राहिले आहे. त्या ठिकाणी कोणीही तपासणीसाठी फिरकताना दिसत नाही. आवक, जावकवरील निर्बंधही उठविले असल्यामुळे मार्केटमध्ये येणाºया - जाणाºयांवर काहीही नियंत्रण राहिलेले नाही. अशीच स्थिती राहिली तर बाजार समितीमध्ये कोरोनाची लाट पुन्हा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गुटखा विक्रेत्यांनाही अभय : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बाजार समितीमध्ये फक्त परवाना असणाºयांनाच परवानगी देण्यास सुरुवात झाली. बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाºयांना मार्केटमधून बाहेर हाकलण्यात आले होते. परंतु काही दिवसांपासून गुटखा, तंबाखू व गांजा विक्रेत्यांनी पुन्हा त्यांचे व्यवसाय सुरू केले आहेत. भाजी व फळ मार्केटमध्ये सर्वांसमक्ष तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असून बाजार समितीचे सुरक्षारक्षक व इतर अधिकारी, कर्मचारी या माफियांना अभय देऊ लागले आहेत.गर्दी जैसे थे : एप्रिलमध्ये बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या होत्या. परंतु सद्य:स्थितीमध्ये मार्केटमधील गर्दी जैसे थे झाली आहे. भाजी मार्केटमधील पॅसेजमधून सकाळी चालताही येत नाही अशी स्थिती आहे. सोशल डिस्टन्सिंगचे कुठेही पालनहोताना दिसत नाही.बाजार समितीमधील१७ सप्टेंबरची वाहनांच्या आवकचा तपशीलमार्र्केट आवककांदा-बटाटा मार्केट ८७भाजी मार्केट ४५०फळ मार्केट २०९मसाला मार्केट ११०धान्य मार्केट १७५एकूण १०३१

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस