शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

CoronaVirus News: पनवेल पालिका क्षेत्रातील १४७ इमारती सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 1:07 AM

पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ मेपर्यंत ४१९ वर गेला आहे.

- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : पनवेल परिसरासह सिडको वसाहतीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. संसर्ग रोखण्याकरिता प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे. महापालिकाकडून आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांच्या १४७ इमारती सील करण्यात आल्या आहेत. इमारत परिसरात नियमाचे पालन करून २८ दिवसांचा कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ मेपर्यंत ४१९ वर गेला आहे. यातून २५२ जण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. उर्वरित १४८ जणांवर उपजिल्हा रुग्णालय आणि एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पनवेल परिसरासह कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल, तळोजा परिसरात कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे.

खारघर येथेही रुग्णसंख्या अधिक आहे. कामोठे येथे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे ८ मेपासून संपूर्ण शहर कंटेनमेंट झोन जाहीर केले होते. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिलासा देत एमजीएम रुग्णालय परिसर व औद्योगिक वसाहत वगळता मंगळवारी कंटेनमेंट झोन खुला करून दिला आहे.

संपूर्ण कंटेनमेंट झोनमुळे नागरिकांना अडथळे निर्माण होत असल्यामुळे यापुढे कोरोनाबाधित इमारतींना सील करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. याअगोदर कळंबोली, नवीन पनवेल, खारघर, तळोजा हा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन जाहीर न करता, इमारती सील केल्या आहेत.

पनवेल महापालिका परिसरात बुधवारपर्यंत १४७ इमारती कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत परिसरातून ये-जा करण्यास मनाई आहे. २८ दिवसांचा कालवधी पूर्ण झाल्यानंतर कंटेनमेंट झोन खुले करण्यात येत आहेत.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना परिसर इमारतपनवेल १४नवीन पनवेल २४कळंबोली २२कामोठे ५७खारघर २५खारघर (घरकुल) ०४तळोजा ०१एकूण १४७

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpanvelपनवेल