शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

coronavirus: परप्रांतीय मजुरांची गावी जाण्यासाठी धडपड, कुटुंबासह वणवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 12:28 AM

कोरोना या महामारीमुळे लॉकडाउन घोषित करण्यात आला, यात अनेक कामगार बेरोजगार झालेले. त्यामुळे ते भेटेल त्या परिस्थितीत आपला गुजारा करीत होते.

- वैभव गायकरपनवेल : मागील अनेक दिवसांपासून पनवेल परिसरात अडकलेल्या स्थलांतरीय मजुरांची गावी जाण्यासाठी धडपड सुरू आहे. बुधवारी पनवेल परिसरातून तीन ट्रेन अनुक्रमे उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश तसेच झारखंडसाठी रवाना होणार होत्या. यामुळे या परप्रांतीय मजूर कु टुंबासह पनवेल रेल्वेस्थानकावर दाखल झाले होते. गावी जाण्यासाठी या परप्रांतीय नागरिकांना शासनाच्या विविध परवानग्यांसाठी कागदपत्र घेऊन मुलाबाळांसह फिरावे लागत आहे.कोरोना या महामारीमुळे लॉकडाउन घोषित करण्यात आला, यात अनेक कामगार बेरोजगार झालेले. त्यामुळे ते भेटेल त्या परिस्थितीत आपला गुजारा करीत होते. यापैकी अनेक जण मैदान, पदपथावर राहत होते. बुधवारी पनवेलवरून गाड्या सुटणार असल्याची माहिती मिळताच या मजुरांनी विविध पोलीस ठाण्यात आपल्या नावनोंदणीसाठी धाव घेतली. यापैकी खारघर पोलीसठाण्याच्या हद्दीत या मजुरांनी पहाटेपासून गर्दी केली होती. दुपारी उत्तरप्रदेशला जाणारी गाडी १६०० मजुरांसाठी रवाना झाली. मध्यप्रदेश व झारखंडसाठी प्रत्येकी १६०० मजुरांना घेऊन बुधवारी सायंकाळपर्यंत ट्रेन रवाना होणार होती. दरम्यान, या मजुरांचे मोठे हाल झाले. मजुरासोबत असलेल्या लहान मुलांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. पोलिसांच्या मदतीने शक्यतो प्रयत्न या मजुरांच्या मदतीसाठी या वेळी करताना दिसून आले. आपत्कालीन परिस्थितीत विविध कायदेशीर प्रक्रिया पार पाडताना या कामगारांना सर्वात जास्त त्रास झाला. झेरॉक्सची दुकाने बंद असल्याने आपल्या कागदपत्रांचे झेरॉक्स काढण्यासाठी या कामगारांना धडपड करावी लागली.बुधवारी दिवसभरात ४८०० कामगार पनवेल परिसरातून रवाना झाले असले तरी अद्याप हजारो कामगार विविध ठिकाणी अडकलेले आहेत. आम्हाला गावी पोहोचविण्यासाठी प्रशासनाने मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.आम्ही एका खासगी वाहनाने जाण्यासाठी मंगळवारी कळंबोलीला थांबलो होतो. मात्र, मंगळवारी ते वाहन आलेच नाही. बुधवारी पायीच आम्ही खारघर गाठले. त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पार पाडून गावी जाण्याची वाट बघतोय. -आशिष सिंग, मजूर, मध्यप्रदेशमजुरांना गावी पाठविण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया केली जात आहे. ती शिथिल करावी विविध कागदपत्रांसाठी लॉकडाउनच्या काळात अनेक मजुरांची मोठी गैरसोय होत आहे. गावी पाठविण्यासाठी जास्तीत जास्त ट्रेन सोडणे गरजेचे आहे. - राजा ठाकूर, मजूर, बिहारसायकल घेऊन नऊ कामगारांचे उत्तरप्रदेशकडे प्रयाणपनवेल : अलिबाग आरसीएफ परिसरात लॉकडाउनमध्ये अडकलेले नऊ कामगार बुधवारी सायकलवर आपल्या मूळगावी उत्तरप्रदेशकडे रवाना झाले. एकूण १६०० किलो मीटर प्रवास करून त्यांना आपले गाव गाठावे लागणार आहे. उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनामुळे देशभर लॉकडाउन सुरू आहे. त्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे, त्यामुळे बांधकाम लगेच सुरू होईल असे चित्र नाही. त्यामुळे याच्याशी निगडित असलेल्या मिस्त्री कामगारांच्या आशा मावळल्या आहेत. अशा प्रकारचे बरेच कामगार रायगड जिल्ह्यात अडकले आहेत. त्यापैकी नऊ जण अलिबाग आरसीएफ येथे लादी बसवण्याचे काम करत होते. लॉकडाउन असल्याने त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे ते बसूनच होते, इतके दिवस होते तितके पैसे खर्च झाले. त्यातच आपल्या मूळ गावी जाण्यासाठी शासकीय अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्यातच रेल्वेने जाण्यासाठी आपला नंबर कधी लागेल हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे सेकंड हॅण्ड सायकल्स खरेदी करून बुधवारी पहाटे ३ वाजता नऊ जण आपल्या उत्तरप्रदेशातील फरिदाबाद जिल्ह्यातील बस्ती या मूळ गावी निघाले.सकाळी १० वाजता ते नवीन पनवेल या ठिकाणी पोहोचले. बॅगमध्ये बिस्कीट, नमकीन त्यांनी घेतले आहेत. मजल दरमजल करत गाव गाठण्याचा संकल्प या मजुरांनी केला आहे. दुपारी कुठेतरी आराम करायचा रात्री प्रवास करायचा, असा दिनक्रम त्यांनी ठरवलेला आहे. येथे उपाशी मरण्यापेक्षा सायकलवर जाण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचे हनुमान निस्सार या कामगाराने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई