CoronaVirus Lockdown: Strict Restrictions Decline Market Commissions, Crowds Under Control | CoronaVirus Lockdown : कडक निर्बंधांमुळे बाजार समितीमध्येही आवक घटली, पाचही मार्केटमधील गर्दी नियंत्रणात

CoronaVirus Lockdown : कडक निर्बंधांमुळे बाजार समितीमध्येही आवक घटली, पाचही मार्केटमधील गर्दी नियंत्रणात

नवी मुंबई : शासनाने कडक निर्बंध लागू केल्यामुळे शनिवारी मुंबई बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये
आवक घटली. शुक्रवारी १,८७३ वाहनांमधून कृषिमाल विक्रीसाठी आला होता. शनिवारी दिवसभरात फक्त १,१६० वाहनांचीच आवक
झाली. माल कमी आल्यामुळे गर्दी नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले असून, मुंबई व नवी मुंबईकरांना आवश्यक तेवढा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही सुरळीतपणे करण्यात आला आहे.
कडक निर्बंधांमधून जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारास वगळण्यात आले होते; परंतु यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने व व्यापारी संघटनांनी सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करून शनिवारी आवश्यक तेवढाच माल मागविण्यात यावा. जास्त माल मागवू नये, असे आवाहन केले हाेते. पाचही मार्केटसाठी व्यापाराची नवीन नियमावली लागू केली होती. यामुळे सर्वच मार्केटमध्ये कमी आवक झाली. कांदा मार्केटमध्ये १०७, भाजी मार्केटमध्ये ४०९, फळ मार्केटमध्ये २२६, मसाला मार्केटमध्ये १०७ व धान्य मार्केटमध्ये ३११ वाहनांचीच आवक झाली होती. 
बाजार समितीमध्ये आवक कमी झाली असली तरी त्याचा परिणाम बाजारभावावर फारसा झाला नव्हता. ग्राहकांना आवश्यक तेवढा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. दिवसभर सुरळीतपणे व्यवसाय सुरू होता.
-संदीप देशमुख, सचिव,
बाजार समिती
 

Web Title: CoronaVirus Lockdown: Strict Restrictions Decline Market Commissions, Crowds Under Control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.