CoronaVirus १८ महिन्यांच्या चिमुरड्याने कोरोनाला 'लोळवले'; ठणठणीत बरा होऊन घरी परतला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 07:51 PM2020-04-27T19:51:23+5:302020-04-27T19:52:19+5:30

कामोठेतील एमजीएममध्ये दाखल करण्यात आले होते.

CoronaVirus 18-month-old boy recovered form Corona; returned home hrb | CoronaVirus १८ महिन्यांच्या चिमुरड्याने कोरोनाला 'लोळवले'; ठणठणीत बरा होऊन घरी परतला

CoronaVirus १८ महिन्यांच्या चिमुरड्याने कोरोनाला 'लोळवले'; ठणठणीत बरा होऊन घरी परतला

Next

वैभव गायकर
पनवेल : मागील आठवड्यात कामोठे एमजीएममध्ये दाखल करण्यात आलेल्या 18 महिन्यांच्या कोरोनाग्रस्त बाळाला सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोविड 19 ची चाचणी निगेटिव्ह आल्याने या चिमुरड्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


 उरण येथील जासई येथील हा बालक आहे.  त्याला कामोठेतील एमजीएममध्ये दाखल करण्यात आले होते. चिमुकल्याने या जगाला भयभीत करणाऱ्या रोगावर यशस्वीपणे मात केली. सोमवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास एमजीएम हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख, प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले, कामोठे एमजीएम डॉक्टर्स तसेच परिचारिकांचा स्टाफ यावेळी उपस्थित होते. टाळ्या वाजवत या बाळाला सर्वांनी निरोप दिला. 

देशभरात कोरोना ग्रस्तांनी मोठ्या प्रमाणावर कोरोनावर मात केली आहे. एकूण रुग्णसंख्येच्या २२ टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अनेक ठिकाणी या रुग्णांचे स्वागत केला जात आहे. काही रुग्णांनी त्यांचे प्लाझ्मा आरोग्य प्रशासनाला देऊन त्याद्वारे उपचार करण्यासाठी मदत केली आहे. 

अन्य बातम्या वाचा...

दिलासा! कोरोना संकटात रोजगार बुडाला? ही सरकारी बँक देणार कर्ज

आज कुछ तुफानी करते है! विक्री थंडावलेली असूनही कंपनीने पगारवाढ केली

गुन्हा दाखल झाल्यानंतर कनिका कपूर वठणीवर; सरकारला दिली 'ऑफर'

CoronaVirus शारीरिक संबंधाद्वारे कोरोना पसरतो? वुहानमध्ये संशोधन

यही मौका है! नितीन गडकरींनी सांगितला चीनवर 'वार' करण्याचा प्लॅन

एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले

CoronaVirus नफेखोरी! 245 ची रॅपिड टेस्टिंग किट ६०० रुपयांना खरेदी; काँग्रेसने विचारला जाब

Web Title: CoronaVirus 18-month-old boy recovered form Corona; returned home hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.