आज कुछ तुफानी करते है! विक्री थंडावलेली असूनही कंपनीने पगारवाढ केली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 05:06 PM2020-04-27T17:06:45+5:302020-04-27T17:25:44+5:30

आयटी कंपनी कॅपजेमिनीनंतर आता कोका कोला कंपनीने पगार कपात न करता थेट पगारवाढ केली आहे. 

Thumbs up! Coca cola incresed salaries of 7000 Employees in corona Crisis hrb | आज कुछ तुफानी करते है! विक्री थंडावलेली असूनही कंपनीने पगारवाढ केली

आज कुछ तुफानी करते है! विक्री थंडावलेली असूनही कंपनीने पगारवाढ केली

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन झाल्याने कंपन्यांचे कंबरडे मोडले आहे. विक्री जवळपास शून्यावर आलेली असताना कंपन्यांनी पगार कपातीचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून न टाकण्याचे आवाहन केले आहे. आयटी कंपनी कॅपजेमिनीनंतर आता कोका कोला कंपनीने पगार कपात न करता थेट पगारवाढ केली आहे. 


कोका कोलाची हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेजस (HCCB) ने तब्बल ७००० कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या कर्मचाऱ्यांचा पगार ७-८ टक्क्यांनी वाढविला आहे. ही पगारवाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने एका मेलमध्ये उत्तर देत ही पगारवाढी कंपनीच्या सर्वच कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कर्मचारी कंपनीसाठी अनेक वर्ष राबतात, त्याची परतफेड म्हणून कंपनीने हा निर्णय घेतल्याचे या मेलमध्ये म्हटले आहे. 


भारतात कोका कोलाच्या १५ फॅक्टऱ्या आहेत. ज्यामध्ये कोक, स्प्राईट आणि थम्सअप बनविले जाते. याशिवाय अन्य शीतपेयेही बनविली जातात. कंपनीने कर्मचाऱ्यांना २०१९ च्या नियमांनुसारच पगारवाढ दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे काम थांबलेले आहे, तसेच विक्रीही थंडावली आहे. यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले जाणार नाही किंवा त्याचा पगार कापला जाणार नाही. 


सोशल डिस्टंन्सिंगमुळे कंपनीला मोठे नुकसान होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे लोक खरेदीसाठी बाजारात जात नाहीयत. याचा परिणाम विक्रीवर झाला आहे, असे कंपनीचे सीईओ जेम्स क्विंसी यांनी सांगितले. 


गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला ३२२ कोटींचा निव्वळ फायदा झाला होता. गेल्या महिन्यापासून कोल्डिंक्स बनविणे बंद असून केवळ पाण्याचे प्लांट सुरु आहेत. 

 

अन्य बातम्या वाचा...

गुन्हा दाखल झाल्यानंतर कनिका कपूर वठणीवर; सरकारला दिली 'ऑफर'

CoronaVirus शारीरिक संबंधाद्वारे कोरोना पसरतो? वुहानमध्ये संशोधन

यही मौका है! नितीन गडकरींनी सांगितला चीनवर 'वार' करण्याचा प्लॅन

बळ दे झुंजायाला... लॉकडाऊनदरम्यान कर्तव्य बजावताना पोलिसाने अदा केला नमाज; नेटिझन्सचा सलाम!

एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले

CoronaVirus नफेखोरी! 245 ची रॅपिड टेस्टिंग किट ६०० रुपयांना खरेदी; काँग्रेसने विचारला जाब

 

Web Title: Thumbs up! Coca cola incresed salaries of 7000 Employees in corona Crisis hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.