शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

वेलनेस टीमकडून कोरोनाबाधित पोलिसांची भेट, कर्मचारी चार महिन्यांत बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 12:00 AM

नवी मुंबई पोलीस दलातील सुमारे ९०० अधिकारी, तसेच कर्मचारी मागील चार महिन्यांत बाधित झाले आहेत.

नवी मुंबई : कर्तव्य बजावताना कोरोनाची बाधा झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपचारांबाबत पोलीस प्रशासन गांभीर्याने दखल घेत आहे. त्याकरिता सक्रिय करण्यात आलेल्या वेलनेस टीमने मंगळवारी रुग्णालयात दाखल असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेऊन धीर दिला.नवी मुंबई पोलीस दलातील सुमारे ९०० अधिकारी, तसेच कर्मचारी मागील चार महिन्यांत बाधित झाले आहेत. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनदरम्यान बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असताना, अथवा पकडलेले आरोपी किंवा तक्रारदार यांच्या संपर्कात आल्याने त्यांना बाधा झाली आहे. मात्र, वेळीच मिळालेल्या उपचारामुळे त्यांच्यावरील संकट टळले आहे. सध्या ५५ जणांवर नेरुळच्या डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी चौघेजण आयसीयूमध्ये दाखल असून, दहा जणांना आॅक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय नेरुळ व कळंबोली येथील विशेष केंद्रातही काहींना क्वारंटाइन करण्यात आले आहे.बंदोबस्तादरम्यान कोरोना झाल्याने आपल्याला किंवा परिवारावर कोणते संकट येऊ नये, अशी पोलिसांची भावना आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांच्या उपचाराची तत्परतेने काळजी घेण्यासाठी वेलनेस टीम तयार करण्यात आलेली आहे. उपायुक्त सुरेश मेंगडे, उपायुक्त शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त विनोद चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, अर्जुन गरड आदींचा या वेलनेस टीममध्ये समावेश आहे. नवनियुक्त आयुक्त बिपिनकुमार सिंग, सहआयुक्त जय जाधव यांनीही या वेलनेस टीमच्या कार्याचा नुकताच आढावा घेतला, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली या वेलनेस टीमने मंगळवारी प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन उपचारासाठी दाखल असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेतली. यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकासोबत उपायुक्त सुरेश मेंगडे, उपायुक्त शिवराज पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण, निरीक्षक एन. कोल्हटकर, अर्जुन गरड यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारासह त्यांना दिले जाणारे जेवण यांचा आढावा घेऊन प्रत्यक्ष चर्चेतून त्यांना इतर काही समस्या आहेत का, हेही जाणून घेतले.यावेळी अचानक पीपीई किट घालून समोर वरिष्ठ अधिकारी उभे असल्याचे पाहून उपचारासाठी दाखल असलेले पोलीसही भारावून गेले. महामारीच्या काळात कर्तव्य बजावत असताना आपल्यावर जरी संकट कोसळले असले, तरी या काळात वरिष्ठ आपल्या पाठीशी असल्याच्या समाधानाची भावना यावेळी पोलिसांनी व्यक्त केली.९०० पोलिसांवर उपचारकोरोनाबाधित पोलिसांच्या उपचारात कसलीही कमी राहू नये, याकरिता काही खासगी रुग्णालयात सोय केलेली आहे. त्यामुळे ९००च्या जवळपास पोलीस व त्यांच्या परिवारातील सुमारे ५०० सदस्य कोरोनाबाधित होऊनही वेळीच उपचार मिळाल्याने सर्वजण सुखरूप आहेत. कोरोनाबाधित पोलिसांना वरिष्ठ तुमच्या पाठीशी आहेत, याची जाणीव करून देण्यासह त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रुग्णालयाला भेट देण्यात आल्याचे वेलनेस टीमकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस