CoronaVirus News: कोविड पॉझिटिव्ह महिलेची पनवेल उपजिल्हा रुग्णालयात सुखरूप प्रसुती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 23:41 IST2021-01-08T23:40:59+5:302021-01-08T23:41:21+5:30
आई, नवजात मुलीची प्रकृती उत्तम; मुलीची कोविड चाचणी अद्याप शिल्लक

CoronaVirus News: कोविड पॉझिटिव्ह महिलेची पनवेल उपजिल्हा रुग्णालयात सुखरूप प्रसुती
वैभव गायकर ,पनवेल :पनवेल उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दुपारी 2 वाजुन 14 मिनिटांच्या सुमारास कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सुखरूप प्रसुती करण्यात आली. जन्माला नवजात मुलीची प्रकृतीदेखील उत्तम आहे.पनवेल मध्ये प्रथमच अशाप्रकारे कोविड पॉझिटिव्ह महिलेची प्रसूती करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ अरुणा पोहरे ,डॉ संजय गुडे,डॉ प्रियांका यांच्यासह शुभांगी गलांडे व भाग्यश्री या परिचारिका यावेळी उपस्थित होत्या. बाळ आणि आई दोघांची प्रकृती उत्तम आहे.प्रसूती नंतर महिलेला रक्त चढविण्यात आले आहे. बाळाची अद्याप कोविड टेस्ट करण्यात आलेली नाही.